शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

7 दिवसांचा युद्धविराम संपला; इस्रायलने पुन्हा गाझावर केली कारवाई, हवाई हल्ल्यांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:07 IST

Israel Hamas War Update: सात दिवसांच्या युद्धविरामात हमासने 105 तर इस्रायलने 240 लोकांची सुटका केली.

Israel Hamas War Update: इस्रायल आणि हमास यांच्यातील सात दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी सकाळी संपल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या इस्रायली लष्कराने पुन्हा एकदा गाझामध्ये कारवाई सुरू केली आहे. 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाला सुरुवात झाली होता. यात दोनवेळा मुदतवाढही देण्यात आली. या काळात गाझामध्ये ठेवलेले 105 ओलिस आणि इस्रायली तुरुंगातील 240 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हमासने युद्धविरामाचे उल्लंघन केले आणि इस्रायली क्षेत्राकडे गोळीबार केला. त्यामुळे आयडीएफने गाझामधील हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध पुन्हा लढाई सुरू केली आहे. गुरुवारी युद्धविराम एक दिवसासाठी वाढवला होता. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास युद्धविराम संपला. 

हमासने टेलिग्रामवर दिले अपडेट मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने आपल्या टेलिग्राम अकाउंवरुन सांगितले की, दक्षिण गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले झाले आहेत. इस्त्रायली विमाने गाझाच्या आकाशात फिरत आहेत. दुसरीकडे, इस्रायली अधिकार्‍यांनी वारंवार सांगितले आहे की, युद्धविराम वाढवण्याची अट अशी आहे की, हमासला दररोज ओलीस ठेवलेल्या 10 इस्रायली महिला आणि मुलांची सुटका करावी लागेल. कराराच्या अटींनुसार, इस्रायलने सोडलेल्या प्रत्येक इस्रायली ओलीसामागे तीन पॅलेस्टिनींची सुटका केली जाईल. आता हा युद्धविराम वाढणार की, युद्ध सुरू राहणार, हे येणाऱ्या काळात कळेल. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय