शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 09:38 IST

स्थानिक मीडियानुसार, इस्रायलने हा हल्ला लेबनॉनमधील बेरूतच्या उत्तरेकडील अलमात गावात केला. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. बुधवारी (दि.१४) इस्रायली सैन्याने लेबनीज राजधानी बेरूतजवळील एका गावात हवाई हल्ला केली. या हल्ल्यात सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक मीडियानुसार, इस्रायलने हा हल्ला लेबनॉनमधील बेरूतच्या उत्तरेकडील अलमात गावात केला. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यानंतर इस्रायल आता नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप लेबनीज सरकारने केला आहे. ज्या गावात हल्ला झाला त्या गावात हिजबुल्लाह संघटनेचे कोणतेही तळ नव्हते किंवा संघटनेचा कोणताही सदस्य तेथे राहत नव्हता. या गावात इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सर्व सामान्य लोक होते, असे लेबनीज सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केला आहे.

९ आणि १० नोव्हेंबरलाही झाला होता मोठा हल्ला यापूर्वी ९ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबर रोजी इस्रायली हवाई दलाने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. दक्षिण आणि पूर्व लेबनॉनच्या वेगवेगळ्या भागात हे हल्ले करण्यात आले होते. याशिवाय, इस्रायली विमानांनी राजधानी बेरूतपासून टायर या बंदर शहरापर्यंत हिजबुल्लाहच्या ठाण्यांना लक्ष्य केले होते.

आतापर्यंत ३१०० हून अधिक लोकांचा मृत्यूदुसरीकडे, या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेवर डझनभर रॉकेट डागले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हमासने हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने हमास आणि हिजबुल्लाहविरोधात युद्धाची घोषणा केली होती. तेव्हापासून इस्रायल हा हमास आणि हिजबुल्लाहविरोधात संघर्ष आहे. गाझापट्टी व्यतिरिक्त इस्रायल लेबनॉनवरही  हिजबुल्लाह संघटना संपवण्यासाठी सतत हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ३१०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,  तर १४ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध