शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:55 IST

Israel-Iran Ceasefire Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाचा घोषणा केल्यानंतरही इराणकडून इस्राइलच्या दिशेने हल्ले करण्यात आल्याने तसेच युद्ध सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आल्याने युद्धविरामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या गोंधळानंतर अखेरीस इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून युद्धविरामाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे.

संपूर्ण जगाची चिंता वाढवणारा इस्राइल आणि इराणमध्ये मागच्या १२ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धविरामाचा घोषणा केल्यानंतरही इराणकडून इस्राइलच्या दिशेने हल्ले करण्यात आल्याने तसेच युद्ध सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आल्याने युद्धविरामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या गोंधळानंतर अखेरीस इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून युद्धविरामाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. तर इस्राइलनेही इराणच्या हल्ल्यांबाबत दिलेला अलर्ट मागे घेतला आहे.

सुमारे १२ दिवस चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्राइल आणि इराण हे युद्धविरामासाठी राजी झाले होते. मात्र युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इराणकडून इस्राइलवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे युद्धविरामाबाबत साशंकता निर्माण झाली होती. इराणने तासाभरात तीन क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे इस्राइल डिफेन्स फोर्सकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला.  

दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर इराणने युद्धविराम लागू केला आहे. तसेच या संघर्षातील अखेरचा हल्ला आपण केल्याचा दावा इराणने केला जात आहे. या हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आमचं शक्तिशाली लष्कर अखेरपर्यंत इस्राइलला त्याच्या हल्ल्यांची शिक्षा देईल, असे  सांगितले होते.

१३ जून रोजी सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत इराण आणि इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यात इ्स्राइल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणुकेंद्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याशिवाय इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणमधील अनेक संशोधक आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इस्राइलला त्याच्या शेजारील आणि मित्रदेशांकडूनही म्हणावी तशी साथ मिळाली नाही. रशिया आणि चीनने नैतिक पाठिंबा दिला पण तेही सक्रियपणे इराणच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलUnited Statesअमेरिका