शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:17 IST

हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे. 

गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेले इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अब्जावधींची राख आणि हजारोंचा बळी घेऊन हे युद्ध समझोत्याच्या टप्प्यात आले आहे. हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे. 

असोसिएटेड प्रेसने दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याचे वृत्त दिले आहे. कतार या दोन्ही बाजुंमध्ये मध्यस्थी करत आहे. गाझामध्ये युद्धबंदी करण्यास आणि अपहृतांच्या सुटकेसाठी एक समझोता केला जात आहे. दोहामध्ये दोन्ही बाजुचे लोक उपस्थित असून चर्चा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. हमासने अद्याप यावर काही घोषणा केलेली नसून इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. 

यानुसार हमास पहिल्या टप्प्यात ३३ अपहृत नागरिकांची सुटका करणार आहे. यात मुले, महिला आणि सैनिक व ५० हून अधिक वयाचे पुरुष, जखमी आणि आजारी लोक असणार आहेत. हमासने अपहरण केलेले लोक जिवंत असतील अशी अपेक्षा इस्त्रायलला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की १६ दिवसांनी उरलेल्या अपहृत नागरिकांना सोडण्याची चर्चा केली जाणार आहे. यामध्ये पुरुष सैनिक आणि तरुणांना सोडले जाणार आहे. तसेच मृतांचा मृतदेहही दिला जाणार आहे. तसेच सैन्याची माघार टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. फिलाडेल्फी कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी इस्रायली सैन्य तैनात केले जाईल. सैन्य मागे घेतले तरी सीमेजवळील शहरे आणि गावांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायली सैनिक तैनात राहणार आहेत. 

उत्तर गाझाच्या रहिवाशांना परतण्याची परवानगी दिली जाणार आहे. परंतू ते सोबत कोणतेही शस्त्र घेऊन जाऊ शकणार नाहीत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासच्या लोकांना सोडले जाणार नाही. परंतू खून किंवा प्राणघातक हल्ल्यांसाठी दोषी ठरलेल्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना सोडले जाणार आहे. 

गाझाची मोठी लोकसंख्या गंभीर मानवीय संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे तिथे मानवतावादी मदत वाढवली जाणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. परंतू इस्त्रायलचा त्याला विरोध आहे. मानवतावादी मदत करण्यास परवानगी देण्यास तयार आहे, परंतु रकमेवर इस्त्रायल तयार नाहीय. गरजू लोकांना पैसे वाटले तर गुन्हेगारी टोळ्या ते लुटू शकतात अशी भीती इस्रायलला आहे. यावर मार्ग काढला जात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल