शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेबनानमध्ये इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हिज्बुल्लाच्या टॉप कमांडरला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 10:41 IST

Israel Lebanon, Top Hezbollah commander captured: किनारपट्टीवर उतरलेल्या सशस्त्र सैन्यगटाने कमांडरला पळवून इस्रायलच्या हद्दीत नेल्याची माहिती

Israel Lebanon, Top Hezbollah commander captured: इस्रायली नौदलाने उत्तर लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या एका बड्या कमांडरला ताब्यात घेतले. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव न सांगता अधिकाऱ्याने सांगितले की, ही कारवाई उत्तर लेबनानच्या बॅट्रोन शहरात करण्यात आली. याआधी शनिवारी, लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले की ते इस्रायलने लेबनीज सागरी कॅप्टनला पकडले. त्याला शुक्रवारी बॅटरुनच्या किनारपट्टीवर उतरलेल्या सशस्त्र गटाने पळवून नेले. या अधिकाऱ्याने सांगितले की, ताब्यात घेतलेल्या कमांडरला इस्रायलच्या हद्दीत घेऊन जाण्यात आले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

संयुक्त राष्ट्र अंतरिम दलाने (UNIF) इस्रायली नौदलाच्या या कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्सने सांगितले की, UNIFIL लेबनानमध्ये कोणाचेही अपहरण करण्यात किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करण्यात सहभागी नाही. ते अशी कुठलीही कारवाई करत नाहीत ज्याने सैन्यदलाची शांतता आणि स्थिरता धोक्यात येते. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात लेबनानमध्ये उपस्थित असलेला हिजबुल्लाह हा सशस्त्र गट हमासला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातही तणाव वाढला आहे. दोघेही अनेकदा एकमेकांना लक्ष्य करत असतात. त्यामुळे अशा करावायांमध्ये सहभागी न होण्याची भूमिका युनिफिलने घेतली आहे.

इस्रायलने युद्धाचा एक नवीन टप्पा जाहीर केला आहे. त्यांचा उद्देश हिज्बुल्लाला सीमेवरून मागे नेणे हे आहे, जेणेकरून उत्तर इस्रायलमधून विस्थापित हजारो लोक परत येऊ शकतील. इस्रायल सातत्याने लेबनानवर हल्ले करत आहे. या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नसरल्लाहसह अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलterroristदहशतवादी