शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

भीषण! इस्रायलचा बदला, मृत्यू आणि उपासमारीचे थैमान; गाझाचा 'हा' परिसर बनला कब्रस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:13 IST

Israel hamas war : गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात इस्रायली सैन्याचे हल्ले सुरू आहेत. परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांचा आकडा 26 हजारांच्या पुढे गेला असून मृतांमध्ये सुमारे दहा हजार मुलांचा समावेश आहे. परिसर कब्रस्तान बनला आहे. असं असूनही तेथे इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात इस्रायली सैन्याचे हल्ले सुरू आहेत. परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील हॉस्पिटलवर छापा टाकला. तपासादरम्यान तीन पॅलेस्टिनींना गोळ्या घालून ठार केलं. नागरिक आणि डॉक्टरांच्या वेशात आलेल्या इस्रायली लष्कराच्या सैनिकांनी जेनिन येथील रुग्णालयात तीन पॅलेस्टिनींची हत्या केली. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध करत ही हत्या असल्याचं म्हटलं आहे. तिथे राहणाऱ्या लोकांनी इस्रायली लष्कराच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली तुरुंगात कैद असलेल्या पॅलेस्टिनींची मोठ्या प्रमाणावर सुटका करणं किंवा गाझावरील इस्रायली हल्ले थांबवणं या कराराला आपण सहमती देणार नसल्याचं म्हटलं आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असं आढळून आले आहे की, इस्रायलने पहिल्यांदा पॅलेस्टिनी भूभागावर हल्ला केला तेव्हापासून गाझामधील निम्म्याहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत किंवा नुकसान झालं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूक लागलेली असलेल्या लोकांच्या जमावाने अन्न हिसकावून घेतल्याने नासिर रुग्णालयात अन्न पोहोचवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की,  ही घटना गाझामधील भीषण परिस्थिती आणि उपासमारी दर्शवते.

युद्धादरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार, अलीकडच्या काही दिवसांत दक्षिणेकडील शहरात लढाई तीव्र झाली आहे. विशेषत: हजारो लोक आश्रय घेत असलेल्या रुग्णालयाच्या संकुलाच्या आसपास ही परिस्थिती आहे. इस्रायलने यापूर्वी सातत्याने दावा केला आहे की हमास कारवायांसाठी सुरुंग, रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधांचा वापर करत आहे. इस्रायली सैन्याने आतापर्यंत हमास 10,000 लोकांना मारल्याचा दावा केला आहे. तर 10,000 जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना