शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

इस्रायल-हमास युद्धात आता 'लष्कर-ए-तोयबा'ची एन्ट्री; बनवला हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:54 IST

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अनेक देश आणि अतिरेकी संघटनांनीही उडी घेतली आहे.

इस्रायल-हमास युद्धात अनेक देश आणि अतिरेकी संघटनांनीही उडी घेतली आहे. एकीकडे इराण, जॉर्डन, इजिप्तसह अनेक देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचबरोबर अनेक अतिरेकी आणि दहशतवादी संघटनाही हमासला उघडपणे पाठिंबा देत आहेत. यामध्ये आता पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हमासच्या बाजूने मोठा प्लॅन तयार करत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये ISI ने मदत केली आहे, ज्याला "हमास सपोर्ट प्लान" असं नाव देण्यात आलं आहे.

पीओकेमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांमधून दहशतवादी पॅलेस्टाईनमध्ये जाण्याचा विचार करत असून हमासला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.  इस्रायलवरील हल्ल्याच्या अवघ्या 4 दिवसांनंतर म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी गुप्तचर यंत्रणांना पीओकेमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्चिंग पॅडमध्ये दहशतवाद्यांच्या हालचालींद्वारे हे महत्त्वाचे इनपुट मिळाले. या हालचाली बहुतांशी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत.

गुप्तचर संस्थांच्या मते, पीओकेमधून सुरू असलेल्या या कॅम्पमधील दहशतवादी प्रथम पीओकेमधून तुर्कीमध्ये जात आहेत, तेथून ते हमासच्या समर्थनार्थ इस्रायली सुरक्षा दलांविरुद्ध भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या पीओके सोडून गेलेले हे दहशतवादी फ्रंटलाईनवर काम करत नसून हमासच्या बॅक एंड सपोर्ट सिस्टमसाठी काम करत आहेत. यामध्ये लॉजिस्टिक मूवमेंट आणि आरिटिलरी डिपार्टमेंटचा समावेश आहे.

हे इंटेलिजन्स इनपुट मिळाल्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून या सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 24 दिवस झाले असून, यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंनी 9700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. hindi.news18.com ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धterroristदहशतवादी