शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-हमास युद्ध थांबलेच नाही! अमेरिकेच्या नाकावर टिच्चून गाझापट्टीवर हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 08:49 IST

युद्धकाळात गाझापट्टी सोडून गेलेल्या व युद्धबंदीनंतर आनंदात परत आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात १०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेच्या मध्यस्थीने गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले इस्रायल-हमास युद्ध थांबविण्यात आले होते. परंतू, सोमवारी रात्री इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर मोठा हल्ला केला आहे. यामुळे युद्धकाळात गाझापट्टी सोडून गेलेल्या व युद्धबंदीनंतर आनंदात परत आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात १०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

इस्रायलच्या सैन्याने एअरस्ट्राईक केला आहे. यामध्ये रॉकेटही या भागात डागण्यात आले. तसेच काहीही झाले तरी आपली सैन्याची कारवाई सुरुच राहणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. यामुळे कसली युद्धबंदी अमेरिकेने केली असा सवाल उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे आज युक्रेन आणि रशियात अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने मोठा हल्ला केल्याने अमेरिकेच्या मध्यस्थीवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या कमांडरना मारण्यासाठी तसेच त्यांचे दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी हा हल्ला केला आहे. जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आम्ही हल्ले करत राहू, या हवाई हल्ल्यांची व्याप्ती आम्ही आणखी वाढविणार आहोत, असेही इस्रायलने म्हटले आहे. 

या हल्ल्यांनंतर हमासने युद्धविरामाच्या शर्तींचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आमच्याकडे जे अमेरिका आणि इस्रायली नागरिक ओलीस आहेत, त्यांचे भविष्य धोक्यात टाकले आहेस असा इशारा दिला आहे. युद्धबंदीनंतर समझोत्यानुसार हमासने काही नागरिकांना सोडले होते. परंतू, पुढच्या प्रक्रियेसाठी उर्वरित नागरिकांना सोडणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर इस्रायलने हे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष