शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 07:22 IST

गाझा रुग्णालयात झालेल्या स्फोटात ४७१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काल बुधवारी सलग १२ व्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, गाझा येथील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या हल्ल्यात ४७१ लोकांच्या मृत्यूला इस्रायल जबाबदार असल्याचा हमासचा दावा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या रॉकेटमुळे झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी तेल अवीवमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. यावेळी गाझा येथील रूग्णालयावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला.

यावर बायडेन म्हणाले की, त्यांनी जे पाहिले आहे त्यावरून असे दिसते की, गाझा रुग्णालयात हा स्फोट इस्रायली सैन्याने नव्हे तर दुसर्‍या टीमने केला होता. यानंतर गाझा येथील रुग्णालयात झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“इस्रायल एकटा नाही,” न्याय मिळाला पाहिजे. हमासच्या दहशतवाद्यांनी नरसंहार केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गाझातील लोकांना अन्न, पाणी, औषध आणि निवारा हवा आहे. आज, मी इस्रायली कॅबिनेटला गाझा मधील नागरिकांना जीव वाचवणारी मानवतावादी मदत देण्यास सहमत होण्यास सांगितले. इस्रायलने मानवतावादी मदत इजिप्तमधून जाऊ देण्याचे मान्य केले आहे.

बायडेन म्हणाले की, मदत हमासला नाही तर नागरिकांकडे गेली पाहिजे. गाझामध्ये हमास निष्पाप लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अमेरिका गाझा आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या लोकांना १०० मिलियन दशलक्ष डॉलर्सचा निधी देईल. हे मानवतावादी मदत प्रदान करेल.

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

नेतन्याहू म्हणाले की, गाझामधील सामान्य लोकांसमोरील संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने मानवतावादी मदत इजिप्तमध्ये जाण्यास परवानगी दिली जाईल. युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीत राहणारे लाखो लोक अन्न, पेय, औषधे आणि विजेच्या संकटाचा सामना करत आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धJoe Bidenज्यो बायडन