शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'पॅलेस्टिनी नागरिकांचा हमासच्या हल्ल्याशी संबंध नाही', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 21:05 IST

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने लोकांना परिसर सोडण्याचा आदेश दिला आहे.

Israel-Hamas: पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना 'हमास'ने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर काही मिनिटांत हजारो रॉकेट डागले. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांनंतर पॅलेस्टाईनमधील लाखो लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका सोमवारपासून इस्त्रायलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करणार आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. 

'पॅलेस्टाईनमधील मोठ्या लोकसंख्येचा हमासच्या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही, पण त्याचे परिणाम भोगत आहेत. या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू नये', असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, या संकट काळात अमेरिका इस्रायलला मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. अमेरिकेने दोन युद्धनौकांसह मोठे सैन्य इस्रायलच्या मदतीसाठी पाठवले आहे.

इस्रायल-लेबनॉन सीमेवरही युद्धाची परिस्थिती इस्रायली मीडियानुसार, हे युद्ध अधिक तीव्र होऊ शकते, कारण इराण थेट त्यात सामील होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, जेक सुलिव्हन यांनी इस्रायल-लेबनॉन सीमेवर युद्धाची शक्यता वर्तवली आहे. इराण दीर्घकाळापासून लेबनॉनमधील हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी गटांचा समर्थक आहे आणि त्यांना पैसा आणि शस्त्रे पुरवतो. या पार्श्वभूमीवर यूएनचे भारतीय सैन्य लेबनॉन सीमेवर तैनात केल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन