शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

इस्रायल-हमास युद्धबंदीची घोषणा, मात्र अखेरच्या टप्प्यात पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:25 IST

कैद्यांच्या सुटकेवरून शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात बाधा निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

दोहा/जेरुसलेम : १५ महिन्यांपासून पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे या दोन्ही देशांत मध्यस्थी करणाऱ्या कतार व अमेरिकेने बुधवारी जाहीर केले आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी एक सुवर्णमध्य मान्य केला असला तरीही हा करार अद्याप पूर्ण झाला नसल्याचे सांगून याला अंतिम रूप दिले जात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. कैद्यांच्या सुटकेवरून शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात बाधा निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

जोवर ३३ इस्रायली नागरिकांच्या सुटकेबाबत हमास स्पष्ट भूमिका घेत नाही आणि त्यांच्या जीविताबाबत माहिती मिळत नाही तोवर या युद्धबंदी कराराला इस्रायली संसद मंजुरी देणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांत युद्धबंदी कराराची ही प्रक्रिया सुरू असतानाच गाझामध्ये इस्रायली हल्ल्यात ७२ लोक ठार झाले. दरम्यान, कतार-अमेरिकेने युद्धबंदी कराराची घोषणा करताच जगभरातून याचे स्वागत सुरू झाले आहे.

करारात आहेत हे मुद्देहमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांची टप्प्याटप्प्याने सुटका करावी.इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व हजारो विस्थापितांना गाझामध्ये परतण्याची परवानगी देणे.या भागात आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी मार्ग खुला करणे.

इस्रायलची भूमिका...जोवर हमास आपली हटवादी भूमिका सोडत नाही तोवर कराराला इस्रायली संसद मंजुरी देणार नाही.

५०,००० पेक्षा अधिक बळी या युद्धात १५ महिन्यांत गेले आहेत. या युद्धात प्रामुख्याने लहान मुले, महिलांचा मृत्यू अधिक झाला आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय