शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:09 IST

या हल्ल्यानंतर तातडीने तिथल्या रुग्णांना दुसरीकडे नेण्यात आले. हे हॉस्पिटल तेहरानच्या गांधी स्ट्रीटवर आहे.

तेहरान - इस्रायलनंइराणमधील महात्मा गांधी रुग्णालयावर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात संपूर्ण हॉस्पिटल उद्ध्वस्त झालं आहे. मागील ४० दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात अमेरिका-इस्रायलकडून नागरी वस्तीत केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ आणि फोटो जगाला दाखवण्याचं काम इराणकडून केले जात आहे. इस्रायलनं हॉस्पिटलवर केलेल्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाले. भारतातील इराणी दूतावासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तेहरान येथील महात्मा गांधी रुग्णालयातील नुकसान दाखवण्यात आले आहे. हे हॉस्पिटल लहान मुलांसाठी बनले होते. हवाई हल्ल्यानंतर हॉस्पिटलची दुरावस्था समोर आली आहे.

या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे की, इराणने युद्धात ११ देशांवर हल्ले केले परंतु त्यांनी कधीही हॉस्पिटल अथवा लहान मुलांना टार्गेट केले नाही. इराणमध्ये ६०० हून अधिक हॉस्पिटल आणि ६० पेक्षा जास्त शाळांवर अमेरिका-इस्रायलने मिसाइल हल्ले केल्याचा आरोप आहे. २ मार्च रोजी इस्रायलने हवाई हल्ला करत उत्तर तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालयाला टार्गेट केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची पुष्टी केली. इस्रायलवर कायम हॉस्पिटलवर हल्ले करण्याचा आरोप लागला आहे. गाझावरील हल्ल्यातही इस्रायलने अनेक हॉस्पिटल टार्गेट केले. या हॉस्पिटलचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी केला जायचा असा इस्रायलचा दावा आहे. मात्र इराणमधील गांधी रुग्णालयावरील हल्ला अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात आला.

इराणमधील विविध माध्यमांनी हॉस्पिटलच्या आतील व्हिडिओ फुटेज समोर आणले आहेत. ज्यात व्हिलचेअरजवळ मलबा विखुरलेल्या अवस्थेत दिसतो. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर तातडीने तिथल्या रुग्णांना दुसरीकडे नेण्यात आले. हे हॉस्पिटल तेहरानच्या गांधी स्ट्रीटवर आहे. लहान मुलांचे हॉस्पिटल म्हणून ते ओळखले जाते. भारतासोबत विशेष नाते असल्याने या हॉस्पिटलचे नाव महात्मा गांधी ठेवण्यात आले होते. हे इराणमधील सर्वात मोठे खासगी रुग्णालय आहे. 

दरम्यान, इराणमध्ये महात्मा गांधी यांच्या नावावर अनेक रस्ते आणि चौक आहेत. अत्याचाराविरोधात लढाई आणि मानवतेच्या दृष्टीने गांधींनी केलेला संघर्ष यासाठी सन्मान म्हणून इराणने ही नावे दिली आहेत. शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून साम्राज्यवादी शक्तींचा सामना महात्मा गांधी यांनी केला होता. त्यामुळे इराणमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. त्यातूनच इराणमध्ये २००८-०९ साली अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे नाव गांधींच्या नावावर ठेवले होते. परंतु इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात गांधी रुग्णालय उद्ध्वस्त झालेली इमारत बनवून राहिलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran claims Israel attacked Tehran's Mahatma Gandhi Hospital, causing devastation.

Web Summary : Iran alleges Israel bombed Tehran's Mahatma Gandhi Hospital, causing significant damage. Iran accuses America and Israel of attacking civilian areas, including hospitals and schools, during the conflict. The hospital, named to honor Gandhi, is now reportedly devastated.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणIsraelइस्रायल