शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आधी इशारा दिला आणि मग हल्ला केला, इस्राइलने हिजबुल्लाहच्या १०० ठिकाणांना केलं लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 11:27 IST

Israel Attack On Lebanon: इस्राइलच्या लष्कराने लेबेनॉनमधील इराणचं समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

इस्राइलच्या लष्कराने लेबेनॉनमधील इराणचं समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान हिजबुल्लाहच्या १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. लेबेनॉनने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइलकडून ही करावई करण्यात आली आहे. आता या हल्ल्यांदरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली आहे.  

इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ यांनी व्यक्तिगतरीत्या या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर हवाई दलाच्या विमानांकडून हिलबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. मागच्या काही वेळात डझनभर लढाऊ विमानांनी दक्षिण लेबेनॉनमध्ये तुफानी हल्ले चढवले आहेत. 

तेल अवीवजवळ असलेल्या बेन गुरियन विमानतळावरील वाहतूक काही काळापुरती थांबवण्यात आली आहे. तसेच आपातकालीन यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळी लेबेनॉनमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांची माहिती देताना इस्राइली लष्कराने सांगितले की, हिजबुल्लाहकडून इस्राइलवर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही स्वत:च्या बचावासाठी लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून आम्ही हल्ला केला. 

हा हल्ला करण्यापूर्वी दक्षिण लेबेनॉनमधील रहिवाशांना इस्राइलकडून अरबी भाषेमध्ये इशारा देण्यात आला. आम्ही तुमच्या निवासस्थानांजवळून इस्राइलच्या भागात हल्ला करण्याच्या हिजबुल्लाहच्या तयारीवर लक्ष ठेवून आहोत. तुम्ही धोक्यात आहात. आम्ही इस्राइलकडून असलेला संभाव्य धोका विचारात घेऊन हल्ला करणार आहोत. तसेच त्यांचा शेवट करणार आहोत. तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडा आम्ही आमच्या रक्षणासाठी हा हल्ला करत आहोत, असा इशारा देत इस्राइलने हा हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यामध्ये इस्राइलच्या लढाऊ विमानांनी दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या १० ठिकाणांवरील हत्यारांचे डेपो आणि एक रॉकेट लॉन्चर पॅडला लक्ष्य केले.   

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय