शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:11 IST

Bangladesh News: अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले हल्ले आणि धर्मगुरू चिन्मय प्रभू  यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता इस्कॉनवर बंदी घालण्याची तयारी बांगलादेश सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशात सुरू झालेली उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. दरम्यान, अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले हल्ले आणि धर्मगुरू चिन्मय प्रभू  यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता इस्कॉनवर बंदी घालण्याची तयारी बांगलादेश सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यातच आता बांगलादेश सरकारने इस्कॉन ही धार्मिक कट्टरतावादी संघटना असल्याचा दावा केला आहे. बांगलादेशच्या अॅटॉर्नी जनरल यांनी याबाबत हायकोर्टात माहिती दिली आहे. सरकारचा हा मुख्य अजेंडा असून, त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये इस्कॉनवर लवकरच बंदी घालण्यात येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

बांगलादेशच्या अॅटॉर्नी जनरल यांनी कोर्टात सांगितले की, इस्कॉन ही एक धार्मित कट्टरतावादी संघटना आहे. त्यानंतर कोर्टाने इस्कॉनबाबत सरकारची भूमिका आणि देशातील सद्यस्थिती याबाबतची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सतर्क राहण्याची सूचनाही कोर्टाने सरकारला दिली आहे.

दरम्यान, इस्कॉनशी संबंधित धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशमधील कोर्टाने त्यांना जामीन न देता त्यांची तुरुंगात रवानगी केली होती.  या कारवाईनंतप चिन्मय दास यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. तसेच बांगलादेशमध्ये तीव्र आंदोलनांनाही सुरुवात झाली होती. त्या दरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान १० जण जखमी झाले होते.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयHinduहिंदू