शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या दहशतवाद्यांचे महिलांच्या वेषात पलायन

By admin | Updated: October 21, 2016 14:52 IST

स्वतःचा जिव वाचवण्यासाठी काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळ काढताना पकडे गेले.

ऑनलाइन लोकमत

इराक, दि. 21 - संपूर्ण जगात दहशत पसरवणारे इसिसचे दहशतवादी स्वतःच भीतीच्या सावटाखाली जगत असल्याचे समोर आले आहे. या दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या मोसुलमध्ये सुरू असलेल्या युद्धातून स्वतःचा जिव वाचवण्यासाठी काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळ काढताना पकडे गेले. चार दिवसांपूर्वी, इराकी आणि कुर्दिश फोजांव्यतिरिक्त पश्चिमेकडील देशांनीही इसिसविरोधात युद्ध छेडले आहे. त्यामुळे अलिकडेच, इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या 'अबू बकर अल बगदादी'ने दहशतवाद्यांना त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींना शहराबाहेर पाठवण्याचे आदेश दिले होते. याचाच फायदा घेत काही दहशतवादी महिलांचे कपडे घालून पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न कुर्दिश फौजांनी हाणून पाडला.
 
ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'मध्ये आलेल्या बातमीनुसार, महिलांचे कपडे घालून पळ काढणा-या या इसिसच्या संशयित दहशतवाद्यांना कुर्दिश फौजांनी मोसुल शहराबाहेर पकडले. सुरू असलेल्या युद्धामुळे बगदादी मात्र मोसुलच्या आतच आपल्या साथीदारांसोबत अडकला आहे. स्वतःच्याच घरावर हल्ले होत असल्याने आता इसिसचे दहशतवादी हल्ल्यापासून वाचण्यासाठी जिव मुठीत घेऊन पळत आहेत. स्वतःच्या बचावासाठी हे दहशतवादी सामान्य नागरिकांचा ढाल बनवून त्यांचा वापर करत असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.  
 
हवेतून होणारा बॉम्बहल्ल्यातही अडथळा निर्माण व्हावा यासाठी हे दहशतवादी तेथील तेलाच्या विहिरींना आग लावत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे, युद्धाच्या मैदानातून पळ काढणा-या दहशतवाद्यांप्रकरणी अमेरिकेसहीत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. हे दहशतवादी जर सीरियातील रक्कामध्ये पोहोचले तर तेथील अन्य दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी करुन पुन्हा गट स्थापन करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.