पॅरिस : रशियाने १९७९ नंतर पहिल्यांदाच दुसऱ्या देशात हवाई हल्ला करीत सीरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे ८ अड्डे उद्ध्वस्त केले. रशियाने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवरील हल्ल्याच्या आडून बशर असद सरकारविरुद्ध उठाव करणाऱ्या बंडखोरांवरच निशाणा साधल्याचा आरोप अमेरिकेने केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि, हा संभ्रम दूर करण्यासाठी रशिया आणि अमेरिकेने लष्करी स्तरावर बैठक बोलाविण्याची तयारी दाखविली आहे. रशियाने अमेरिकेचा आरोप फेटाळत हे आरोप म्हणजे संभ्रामक माहितीचे युद्ध असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
इसिसचे सीरियातील आठ अड्डे उद्ध्वस्त
By admin | Updated: October 1, 2015 22:27 IST