शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेवर इसिसचा हल्ला!

By admin | Updated: June 13, 2016 05:39 IST

आॅरलँडो शहरात समलैंगिक नाइट क्लबमध्ये घुसून हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले आहेत.

आॅरलँडो (अमेरिका) : अमेरिकेत फ्लोरिडा प्रांतात आॅरलँडो शहरात समलैंगिक नाइट क्लबमध्ये घुसून हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर ५३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांशी झालेल्या चकमकीत हा हल्लेखोर मारला गेला असून हे ९/११ नंतरचे सर्वांत मोठे दहशतवादी कृत्य असल्याचे मानले जात आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने आपल्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही हे दहशतवादी कृत्य आणि द्वेषातून केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच या हल्ल्याच्या पाठीशी असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. ओमर मीर सिद्दिकी मतीन असे हल्लेखोराचे नाव असून, तो मूळचा अफगाणिस्तानचा आणि सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास नाइट क्लबच्या बाहेरील अधिकाऱ्याची आणि त्याची चकमक झाली. मतीन त्यानंतर क्लबमध्ये गेला. क्लबमध्ये त्यावेळी ३०० हून अधिक समलिंगी लोक होते. अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात एकतृतीयांश लोकांना गाळ्या लागल्या. त्यानंतर त्याने काही जणांना ओलीस ठेवले. स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस टीमने हल्लेखोर मतीन अखेर ठार केले. (वृत्तसंस्था)>अमेरिकेच्या इतिहासातील गोळीबाराची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. इस्लामिक स्टेटचे समर्थक या हल्ल्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. इसिसची वृत्तसंस्था ‘अमाक’ने या हल्ल्यामागे आपलेच सदस्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता इसिसविरूद्ध अमेरिका असे युद्धच भडकण्याची चिन्हे आहेत.>कोणाचीच गयकेली जाणार नाहीअमेरिकेच्या द्वेषातून केलेले हे अतिरेकी कृत्य आहे. आम्ही त्याची मूळे शोधून काढू आणि जो कोणी या कृत्यापाठीमागे असेल त्याची गय केली जाणार नाही. अमेरिकेतील नागरिकांची आणि देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. दहशतवाद्यांची अशी कोणतीही कृती आम्हाला विचलित करू शकत नाही.- बराक ओबामा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिकाओमर मतीन असे हल्लेखोराचे नाव आहे. तो मूळ अफगाणिस्तानचा असून सध्या अमेरिकन नागरिक होता. त्याच्याकडे एआर-15 ही रायफल आणि हँडगन होती.