शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा न्यूटनला करावं लागलं होतं 'वर्क फ्रॉम होम'; झाला होता सर्वात मोठा साक्षात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 18:33 IST

साडेतीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये आली होती प्लेगची साथ; अनेकांना बसला होता फटका

ठळक मुद्दे१६६५ मध्ये लंडनमध्ये आली होती प्लेगची साथप्लेगची साथ आल्यानं शाळा, महाविद्यालय लंडनमध्ये बंदसाडेतीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये निर्माण झाली होती भीषण परिस्थिती

मुंबई: सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. कोरोनाचं संसर्ग अतिशय वेगानं होत असल्यानं अनेकांच्या मनात भीती निर्माण झालीय. जगभरातल्या अनेक देशांनी शाळा, महाविद्यालयं बंद केली असून काही ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठीत कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साडे तीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे जगात मोठा चमत्कार घडला होता. १६६५ मध्ये लंडनमध्ये प्लेगची साथ आली होती. प्लेगची लागण झाल्यानं अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यावेळी आयझॅक न्यूटन ट्रिनिटी महाविद्यालयात शिकत होते. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसारखीच अवस्था त्यावेळी निर्माण झाली होती. न्यूटन त्यावेळी विशीत होते. प्लेगचा संसर्ग अतिशय वेगात होत असल्यानं त्यावेळीही प्रशासनानं नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय संसर्ग झालेल्या अनेकांना क्वॉरेंटाईन (विलगीकरण) करण्यात आलं. प्लेगमुळे महाविद्यालयं बंद करण्यात आल्यानं न्यूटन घरी परतले. त्यामुळे न्यूटन त्यांच्या वूलस्टोर्प मनोरमधल्या त्यांच्या घरी परतले. घरी परतल्यानंतरही न्यूटन यांचं संशोधन सुरूच होतं. यावेळीच त्यांनी गुरुत्वाकर्षावर काम केलं. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन दैनिकानं न्यूटन यांनी प्लेगच्या काळात केलेल्या संशोधनावर एक विशेष लेख प्रसिद्ध केलाय. त्यात गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर न्यूटन यांनी प्लेगची साथ आलेल्या दिवसांतच काम केल्याचा उल्लेख आहे. प्लेगमुळे महाविद्यालय बंद असल्यानं न्यूटन त्यांच्या घरी परतले होते. त्यावेळी एका उद्यानात निवांत बसले असताना ते गुरुत्वाकर्षण शक्तीवर विचार करत होते. गुरुत्वाकर्षण केवळ पृथ्वीपासून काही अंतरापर्यंत मर्यादीत नाही, तर ते चंद्रापर्यंत असावं, हा विचाप याच काळात न्यूटन यांच्या डोक्यात पहिल्यांदा आला. यानंतर एप्रिल १६६७ मध्ये महाविद्यालयात परतले. 

टॅग्स :corona virusकोरोना