शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:22 IST

America Iran War: शस्त्रसंधीमुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले असून, डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे.

America Iran War: अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली. दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू असणार आहे. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिकेत अचानक बदल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली. दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि इतर आक्रमणे स्थगित करण्यास सहमत आहे. सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक पाऊल आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. असे असले तरी अमेरिकेच्या ८५ खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना या युद्धामुळे अमेरिकन नागरिकांचा तीव्र विरोध पत्करावा लागत आहे. हा विरोध अद्यापही कायम असल्याचे म्हटले जात आहे. 

अमेरिकेतील एका गटाकडून युद्धविरामाच्या घोषणेवरून ट्रम्प यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या संघर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प झुकले आणि त्यांनी इराणसमोर सरेंडर केले. इराणविरुद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्ण पराभव झाला आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण देण्यास सहमती दर्शवली आहे. ही बाब संपूर्ण जगासाठी असामान्य आणि घातक आहे, अशी टीका अमेरिकेचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी केली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग

युद्धविरामामुळे इराणमध्ये जल्लोष सुरू असताना अमेरिकेतील राजकारण मात्र तापल्याचे पाहायला मिळत आहे. ॲक्सिऑसच्या अहवालानुसार, ८५ हून अधिक डेमोक्रॅटिक खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. हे सर्व खासदार विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे असले तरी, ट्रम्प यांना यापूर्वी कधीही इतक्या व्यापक विरोधाच्या दबावाला सामोरे जावे लागले नव्हते, असे म्हटले जात आहे. एपस्टाइन फाइल्समधील कृत्ये लपवण्यासाठी ट्रम्प यांनीच हे युद्ध सुरू केले, असा मतप्रवाह अमेरिकेत असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अनेक अमेरिकी कायदेतज्ज्ञ आणि नेत्यांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचे वारंवार शब्द बदलणे, डावपेच, धोरणे बदलणे आणि इराण युद्धाबाबत अपमानास्पद पोस्ट लिहिणे, यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीला अध्यक्षपदावरून दूर करणे सोपे नसले तरी, परिस्थितीनुसार वापरता येतील, असे काही नियम आणि कायदे आहेत, त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे कयास बांधला जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's truce in jeopardy? 85 demand resignation; Opposition persists.

Web Summary : Despite a truce, 85 US lawmakers demand Trump's resignation amid criticism over Iran policy. Accusations of surrender and mental health concerns fuel calls for his removal.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर