शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:31 IST

Iran War News: इराणला युद्ध नको आहे, परंतु आम्ही होर्मुझ सामुद्रधुनीबाबत हक्क सोडणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.

Iran War News: इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने युद्धादरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरले असण्याची शक्यता वर्तवणारा एक नकाशा प्रसिद्ध केला. इराणच्या निमशासकीय वृत्तसंस्था ‘इसना’ आणि ‘तस्नीम’ यांनी हा नकाशा प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. तेलवाहू जहाजांना ओमानच्या किनारपट्टीऐवजी आता इराणच्या किनारपट्टीजवळून, म्हणजेच उत्तर मार्गाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. या मार्गावरून सुरक्षितपणे जाण्यासाठी इराणच्या नौदलाशी समन्वय साधणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. हा नकाशा प्रसिद्ध करून इराणने अमेरिकेवर दबाव निर्माण केल्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आता इराणचे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी यांनी होर्मुझ सामुद्रधुनी संदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. 

इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड आणखी घट्ट करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच होर्मुझवर टोल घेण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे. इराणच्या या अडवणुकीमुळे जगभरातील अनेक देश नाराज असून, तणाव वाढत चालला असल्याचे म्हटले जात आहे. मोज्तबा खामेनी यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केल्याचे सांगितले जात आहे. इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केवळ नियंत्रण ठेवण्याऐवजी, एक नवी रणनीती विकसित करत आहे आणि आपले नियंत्रण पुढील टप्प्यावर नेत आहे, असे यात म्हटले आहे. युद्धविरामानंतर पाकिस्तानात इराणी आणि अमेरिकी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असतानाच इराणने ही नवीन चाल खेळल्याचे म्हटले जात आहे. 

या युद्धाचा विजेता निश्चितच इराण आहे

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर वाचून दाखवलेल्या एका निवेदनात मोज्तबा यांनी या नव्या धोरणाबाबत माहिती दिली. इराण होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात एका नव्या टप्प्यात प्रवेश करेल. इराणला युद्ध नको आहे, परंतु ते आपले हक्क सोडणार नाही. सर्व विरोधकांना एकच असल्याचे आम्ही मानतो. या युद्धाचा विजेता निश्चितच इराण आहे, असा पुनरुच्चार खामेनी यांनी केला. तसेच इराण या संघर्षाकडे सामरिक आणि प्रतिकात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून पाहते. प्रत्युत्तर देणे हाच इराणच्या भूमिकेचा मुख्य मुद्दा आहे. इराण आपले सर्वोच्च नेते दिवंगत अली खामेनी आणि आपल्या हुतात्म्यांचा बदला घेण्यास कटिबद्ध आहे, असेही मोज्तबा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व जगाला, विशेषतः आशियाई देशांना, अधिकाधिक स्पष्ट झाले आहे. इराण आता त्याच भीतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. इराण आता होर्मुझ सामुद्रधुनीचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे म्हटले जात आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील निर्बंध पद्धतशीरपणे अधिक कडक करू शकतो, असे मानले जात आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's New Hormuz Strategy: Toll Collection & Rising Tensions

Web Summary : Iran is tightening its grip on the Strait of Hormuz, planning to levy tolls and implement a new strategy. This move has sparked international concern and heightened tensions, especially following a map hinting at naval mines. Iran asserts its rights and sees itself as the victor.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण