शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

इराण अजूनही सक्षम; अमेरिकन फायटर जेट पाडल्याने खळबळ, युद्धाची तीव्रता अधिकच वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:51 IST

अमेरिकेचे विमान पाडणे ही दुर्मीळ घटना, विमानावर खांद्यावरून क्षेपणास्त्र डागल्याची शक्यता

वॉशिंग्टन: इराणने अमेरिकेची दोन लष्करी विमाने पाडल्याची घटना गेल्या २० वर्षांतील अत्यंत दुर्मीळ मानली जात आहे. अमेरिकेच्या मते, ‘एफ-१५ इ स्ट्राइक ईगल’ हे लढाऊ विमान पाडण्यात आले असून, एका जवानाची सुटका झाली आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तसेच इराणच्या माध्यमांनी ‘ए-१० थंडरबोल्ट २’ या विमानालाही लक्ष्य केले असा दावा केला आहे. अमेरिकेने इराणची लष्करी क्षमता कमी झाल्याचे सांगितले असले तरी, ही घटना इराण अजूनही प्रभावी प्रतिकार करू शकतो हे दर्शवते. तज्ज्ञांच्या मते, या हल्ल्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर केल्याची शक्यता असली तरी खांद्यावरून क्षेपणास्त्र डागले गेल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण हल्ल्यानंतर अशी क्षेपणास्त्रे ओळखणे कठीण असते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

एफ-१६ हे अत्याधुनिक विमान चालवण्याचा अनुभव असलेले अमेरिकेच्या हवाई दलातील माजी ब्रिगेडियर जनरल ह्युस्टन कँटवेल यांच्या मते २००३ साली इराक युद्धात ए-१० हे विमान पाडण्यात आले होते. त्यानंतर २० वर्षांनंतर खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राने हे विमान पाडल्याची शक्यता आहे. अमेरिका अनेक बंडखोरांविरोधात आजपर्यंत लढली आहे. पण बहुतांश बंडखोरांकडे खांद्यावर डागली जाणारी क्षेपणास्त्रे नसतात. पण इराणने हे करून दाखवले आहे. बेहनाम बेन टॅब्ल्यू या संरक्षण तज्ज्ञाने इराणची संरक्षण व्यवस्था कमकुवत असली तरी ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही, असे म्हटले आहे. तर मार्क कॅनसियन या अन्य तज्ज्ञाने पोर्टेबल क्षेपणास्त्रे वापरली गेल्याची शक्यता वर्तविली आहे.

२० वर्षांनी विमान पाडले

अमेरिकेचे शेवटचे लढाऊ विमान दि. ८ एप्रिल २००३ रोजी इराक युद्धात बगदादमध्ये पाडण्यात आले होते. त्या वेळी वैमानिक सुरक्षितरीत्या बाहेर पडून वाचला होता. त्याआधी १९८० मध्ये ऑपरेशन ईगल क्लॉ या अपयशी मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टर आणि विमानाच्या धडकेत स्फोट होऊन आठ अमेरिकी जवानांचा मृत्यू झाला होता.

‘हेलिकॉप्टर असुरक्षित’

गेल्या काही दशकांत अमेरिकेची अनेक हेलिकॉप्टर पाडण्यात आली आहेत. २००५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये एमएच-४७ चिनूक हेलिकॉप्टरवर रॉकेट हल्ला होऊन १६ जणांचा मृत्यू झाला होता. ह्युस्टन कँटवेल यांच्या मते, हेलिकॉप्टर कमी उंचीवर आणि कमी वेगाने उड्डाण करत असल्याने ती अधिक असुरक्षित ठरतात.

अमेरिकेपुढे राजकीय संकट

बेपत्ता वैमानिकाला शोधण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही एकूण घटना अमेरिका व इस्रायलसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व धोकादायकही आहे. जर इराणला हा वैमानिक सापडला आणि त्याची चित्रफित इराणच्या टीव्हीवर दाखवली गेली तर तो इराणसाठी मोठा प्रचारात्मक विजय ठरेल. दुसरीकडे, अमेरिकेसाठी राजकीय अपमानच असेल. इराणच्या हाती एक 'युद्धबंदी' लागेल. याचा वापर ते पुढील वाटाघाटीसाठी 'बार्गेनिंग चिप' म्हणून करू शकतात. अमेरिकेने इराणच्या लष्कराचा नाश केल्याचा अनेकवेळा दावा केला आहे. प्रत्यक्षात इराण चिवटपणे लढत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Resilience: Downing US Jet Escalates Tensions, Fuels War Concerns.

Web Summary : Iran downed a US F-15 fighter jet, escalating tensions. Experts suggest shoulder-fired missiles were used. It's the first US fighter jet downed since 2003. The incident raises political risks for the US and Israel, showing Iran's persistent military capabilities.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर