मध्य पूर्वेतील तणावात मंगळवारी रात्री अमेरिकेने कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर एका डूम्सडे बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केली. सांता बारबराजवळील वॅडेनबर्ग स्पेस फोर्सच्या बेसवर रात्री ११ वाजता मिनिटमॅन III बॅलेस्टिक मिसाइल लॉन्च करण्यात आली. ज्यात हिरोशिमावर पाडण्यात आलेल्या अणुबॉम्बहून २० पट जास्त ताकदीची अणुशस्त्रे नेण्यासाठी सक्षम आहे.
US स्पेस फोर्सनुसार, जीटी २५४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निशस्त्र रॉकेटने पश्चिम-मध्य प्रशांत महासागरातील मार्शल बेटांजवळ आपले टार्गेट गाठले. त्याची प्रभावता, तयारी आणि अचूकता पडताळण्यासाठी हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. यामुळे आम्हाला क्षेपणास्त्र प्रणालीच्या वैयक्तिक घटकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याची परवानगी मिळाली असं स्क्वाड्रनचे कमांडर कर्नल कॅरी व्रे यांनी निवेदनात सांगितले.
मध्य पूर्वेत बनली युद्ध भूमी
मागील काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर हल्ला केला. त्यात देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या इराणने मध्य पूर्वेतील सर्व देशांना टार्गेट केले. खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण सातत्याने इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्य तळांना टार्गेट करत आहे. दुसरीकडे हिज्बुल्लाह सक्रीय झाल्यानंतर इस्रायलने लेबनानची राजधानी बेरूतमध्येही हल्ला चढवला आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय आणखी मोठा हल्ला होणार असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेने का केली मिसाइल चाचणी?
दरम्यान, एअर फोर्स ग्लोबल कमांडनुसार मंगळवारी केलेली चाचणी ही नियमित होती आणि फार पूर्वीपासून ती निर्धारित करण्यात आली होती. मिनिटमॅन III क्षेपणास्त्र हे अमेरिकेच्या अणु त्रिकोणाचा एक भाग आहे, ज्यामध्ये जमीन, समुद्र आणि हवेतून जगाला नष्ट करणारी शस्त्रे डागण्याची क्षमता समाविष्ट आहे. अणु युद्ध रोखण्यासाठी याचे डिझाईन करण्यात आले आहे. जर अमेरिकेवर कधी अणु हल्ला झाला तर त्याला पलटवार करण्यासाठी हे क्षेपणास्त्रे बनवण्यात येत आहे. मिनिटमॅन III हे अमेरिकेतील सर्वात जुने आयसीबीएम आहे, जे १९७० पासून वापरात आहे. ते जमिनीवरून सोडले जाते आणि त्याची मारा क्षमता १३,००० किलोमीटर आहे. ते अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. परंतु मंगळवारी करण्यात आलेल्या चाचणीत कोणतेही शस्त्र नव्हते.
दरम्यान, अमेरिकेजवळ जवळपास ४०० मिसाइल आहेत ज्याचा रशिया आणि चीनसारख्या देशांविरोधात वापर केला जाऊ शकतो. या मिसाइलला मिनिटमॅन नाव दिले आहे कारण हे एका मिनिटांत तयार होते. अमेरिका २०३० पर्यंत या मिसाइलला नवे रुप देण्याची योजना आखत आहे. तोपर्यंत याची चाचणी सुरूच राहील.
Web Summary : Amidst Middle East tensions, the US tested a Minuteman III missile, capable of carrying nuclear weapons, near California. The test, designed to assess accuracy, follows escalating conflict involving Iran, Israel, and US forces, with threats of further action.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच, अमेरिका ने कैलिफ़ोर्निया के पास परमाणु हथियार ले जाने में सक्षम एक मिनटमैन III मिसाइल का परीक्षण किया। यह परीक्षण, सटीकता का आकलन करने के लिए किया गया, ईरान, इज़राइल और अमेरिकी सेना से जुड़े बढ़ते संघर्ष के बाद किया गया है, जिसमें आगे की कार्रवाई की धमकी दी गई है।