शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

"इराण मोठा अन् मजबूत देश, वेळ तर लागणारच...!"; आणखी किती दिवस बॉम्बिंग चालणार? ट्रम्प यांनी संपूर्ण प्लॅनच सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:36 IST

Israel Iran War : या कारवाईत इराणचे सुमारे ४८ नेते मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला...

US Israel-Iran War : इराण युद्ध आणखी किती दिवस चालणार? यासंदर्भात खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. हा संघर्ष आणखी चार आठवडे सुरू राहू शकतो, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहे. तसेच, 'इराण हा एक मोठा आणि मजबूत देश आहे. यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणे स्वाभाविक आहे', असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

असा आहे संपूर्ण 'ट्रम्प प्लॅन'! -'द डेली मेल'ला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "हे आधीपासूनच चार आठवड्यांचे नियोजन होते. आम्हाला वाटते की यासाठी चार आठवडे किंवा त्यापेक्षा थोडा कमी वेळ लागेल. सर्व काही नियोजनानुसारच सुरू आहे. अमेरिकेने इराणची संपूर्ण लीडरशिप संपवली आहे." एवढेच नाही तर, या कारवाईत इराणचे सुमारे ४८ नेते मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला.

सैनिकांना श्रद्धांजली -इराण युद्दात तीन अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "ते जवान जबरदस्त होते. मात्र, अशा घटना घडू शकतात याची आम्हाला भीती होती." यावेळी त्यांनी शहीद सैनिकांना श्रद्धांजलीही अर्पण केली. तसेच, आपल्या कार्यकाळातील हे पहिले अमेरिकन मृत्यू असल्याचेही ते म्हणाले.

चर्चेचा मार्गही खुला -यावेळी, इराणसोबत चर्चा होऊ शकते? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "माहीत नाही, इराणला चर्चा करायची आहे, पण मी त्यांना सांगितले की, चर्चा गेल्या आठवड्यात करायची होती. या आठवड्यात नाही." दरम्यान, ट्रम्प यांनी बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि जॉर्डनच्या नेत्यांशी संवाद साधला असून, लवकरच ते अमेरिकन जनतेला संबोधित करणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War: Trump Reveals Plan, Timeline, and Casualties; Dialogue Open?

Web Summary : Trump suggests the Iran conflict may last four weeks, claiming leadership elimination and Iranian casualties. He mourned American soldiers' deaths, his first in office, but remains open to dialogue, though he prefers earlier talks.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलAmericaअमेरिकाUS ElectionAmerica Electionwarयुद्ध