शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

इराण-इंग्लंड संबंध सुधारले; चार वर्षांनंतर तेहरानमध्ये ब्रिटीश दुतावास

By admin | Updated: August 23, 2015 23:32 IST

मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने

तेहरान : मागील आठवड्यामध्ये अमेरिका व क्युबाने आपले संबंध सुधारत एकमेकांच्या राजधानीत दुतावास सुरू केले होते. त्याप्रमाणेच आता इराण व इंग्लंडने गेली चार वर्षे ठप्प झालेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दूतावास सुरू केले. २०११ साली तेहरानमधील दूतावासासमोर निदर्शने होऊन हल्लाबोल केल्यानंतर तेथील दूतावास बंदच करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला होता.तेहरानमधील दुतावास सुरु करण्याच्या प्रसंगी इंग्लंडच्या सेक्रेटरी आॅफ फॉरेन फिलिप हॅमंड यांनी स्वत: इराणमध्ये जाऊन या घटनेचा साक्षीदर होण्याचे ठरविले. तेहरान येथील दुतावास सुरु झाल्यानंतर हॅमंड यांनी आनंद व्यक्त केला आणि दोन्ही देशांच्या संबंधामध्ये आज मैलाचा दगड प्रस्थापित झाला असेही टिष्ट्वटरवरून टिष्ट्वट केले. इराण- इंग्लंडचे संबंध १९७९ : इस्लामिक क्रांतीनंतर इंग्लंडने तेहरान दूतावास बंद केला१९८० : बंदुकधारी सहा इराणींनी लंडंनमधील इराणच्या दूतावासाचा ताबा घेऊन २६ लोकांना बंदी बनविले होते. याप्रसंगी दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले. दहशत माजविणाऱ्यांनी एका बंद्यास मारुन खिडकीतून बाहेर फेकले होते.१९८८ : तेहरान दुतावास पुन्हा सुरू१९८९ : सॅटनिक व्हर्सेस लिहिणाऱ्या सलमान रश्दींना मारण्याचा अयातुल्ला खोमेनींचा फतवा. रश्दी इंग्लंÞडच्या आश्रयास असल्यामुळे पुन्हा तणाव२००१ : इस्लामिक क्रांतीनंतर इराणला भेट देणारे जॅक स्ट्रॉ पहिलेच फॉरेन सेक्रेटरी ठरले.२००४ : इराक कारवाईवेळेस, इराकमधील शियांच्या पवित्र शहरांमध्ये सैन्य उतरल्यामुळे इराणी जनता नाराज, दूतावासासमोर निदर्शने. इराणने इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (आयएइए) ला सहकार्य न केल्याच्या पार्श्वभूमिवर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडने इराणच्या भूमिकेवर टीकात्मक मसुदा तयार केला.२००९ : इंग्लंड ही जगातील उद्धट शक्तींपैकी सर्वात वाईट शक्ती असल्याचे खोमेनींचे वक्तव्य२०११ : आयएईएच्या अहवालानंतर संबंध तोडण्याचा इंग्लंडचा निर्णय. ब्रिटिश राजदुताने इराण सोडावा असा ठराव इराणी संसदेने केला व दोन दिवसांनंतर ब्रिटीश दूतावासासमोर निदर्शने केली. व दुतावासावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणी मुत्सद्यांना इंग्लंडबाहेर जाण्यास ब्रिटिश सरकारने ४८ तासांची मुदत दिली.२०१५ : अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन यांच्याबरोबर इराणचा करार, दोन्ही देशानी एकमेकांच्या राजधानीमध्ये दूतावास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार फिलीप हॅॅमंड यांची इराण भेट झाली आहे.रुहानी इफेक्टइंग्लंड आणि इराणमध्ये दूतावास उघडून संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यामागे इराणमधील नव्या सरकारची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. २०१३ साली हसन रुहानी अहमदेजिनादना हरवून राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य देश, रशियाशी संबंध सुधारण्यावर भर दिला. अमेरिकेबरोबरच्या अणुकरारापाठोपाठ इतरही सकारात्मक पावले उचलल्यामुळे त्यांची पाठ थोपटली जात आहे.(वृत्तसंस्था)