शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Inflation in Pakistan: महागाईने पाकिस्तानी नागरिक त्रस्त; 1600 रुपये किलो चहा तर चिकनची किंमत..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 21:06 IST

Inflation in Pakistan : आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये महागाईने लोकांचे जगणेही कठीण केले आहे.

Inflation in Pakistan: भीषण आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्येमहागाईने लोकांचे जगणेही कठीण केले आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या एका बातमीचा हवाला देत म्हटले की, कराची शहरासह संपूर्ण पाकिस्तानमध्ये जिवंत कोंबडी आणि कोंबडीच्या मांसाच्या किमतीने नवे किर्तीमान केले आहेत. 

तेथील एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले की, कराचीमध्ये सध्या कोंबडीची किंमत 490 रुपये प्रति किलो झाली आहे, तर कोंबडीच्या मांसाची किंमत 720 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. फीडच्या कमतरतेमुळे अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यामुळे किमतीत ही वाढ झाल्याचे म्हटले आहे. पोल्ट्री व्यवसाय मालकांनी गगनाला भिडलेल्या किमतींमागे चारा टंचाई हे कारण सांगितले आहे. 

चिकनच्या किमतीने लोक हैराणरावळपिंडी, इस्लामाबाद आणि इतर काही शहरांमध्ये कोंबडीची किंमतही सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे. एक किलो पोल्ट्री मांस 700-720 रुपयांना विकले जात आहे. दरम्यान, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेल्या लाहोरमध्ये कोंबडीच्या मांसाची किंमत 550 ते 600 रुपये प्रति किलो झाली आहे. या वाढत्या किमती अनेक ग्राहकांसाठी चिंतेचे कारण बनल्या आहेत. विशेष म्हणजे, कोंबडी हे पाकिस्तानातील मुख्य अन्नांपैकी एक आहे.

चहाच्या किमतीनेही फोडला घाम पाकिस्तानात गेल्या 15 दिवसांत चहाची किंमत 1,100 रुपयांवरुन 1,600 रुपये प्रति किलो झाली आहे. एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले की, आघाडीच्या ब्रँडने 170 ग्रॅम दाणेदार आणि वेलची पॅकची किंमत 290 रुपयांवरून 320 आणि 350 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 900 आणि 420 ग्रॅम पॅकची किंमत अनुक्रमे 1,350 आणि 550 रुपयांच्या तुलनेत 1,480 आणि 720 रुपये झाली आहे. इतर कंपन्याही किंमत वाढवण्याच्या तयारीत आहेत

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाईInternationalआंतरराष्ट्रीय