शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारत हा प्रदूषण पसरवणारा देश- डोनाल्ड ट्रम्प

By admin | Updated: May 1, 2017 22:34 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावर भारतासह रशिया आणि चीनवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 1 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारावर भारतासह रशिया आणि चीनवर निशाणा साधला आहे. पेन्सिल्वेनियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत ट्रम्प म्हणाले, पॅरिस करारासाठी अमेरिका ट्रिलियन डॉलर खर्च करत आहे. मात्र रशिया, चीन आणि भारतासारखे प्रदूषण करणारे देश काहीच देत नाही आहेत. येत्या दोन आठवड्यात पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. रॅलीमध्ये त्यांनी जागतिक पर्यावरणाच्या मुद्द्यावर झालेल्या या क्लायमेट डीलला एकतर्फी सांगितलं आहे. या कराराअंतर्गत पैसे भरण्यासाठी अमेरिकेला वेगळ्या पद्धतीनं लक्ष्य करण्यात येत आहे. खरं तर प्रदूषण पसरवणारे रशिया, चीन आणि भारतासारखे मोठे देश काहीच योगदान देत नाहीत. ट्रम्प म्हणाले, येत्या दोन आठवड्यांत पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार आहोत. पॅरिस करार हा एकतर्फी आहे. त्यामुळे अमेरिकेला अरबो डॉलरचं नुकसान सोसावं लागतंय. मात्र प्रदूषण करणा-या रशिया, चीन आणि भारताचं यात कोणतंही योगदान नाही. जलवायू परिवर्तन डोळ्यांसमोर ठेवून 2015मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पारंपरिक रूपरेषेंतर्गत 194 देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. यातील 143 देशांनी या कराराचं जोरदार समर्थनही केलं आहे.जलवायू तापमान कमी करण्याचा या कराराचा मुख्य उद्देश आहे. पॅरिस कराराचं पालन करताना अमेरिकेच्या जीडीपीला येत्या 10 वर्षांत 2.5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 1606 अरब रुपयांहून जास्तीचं नुकसान सोसावं लागू शकते. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेतील कारखाने आणि प्लांट्स बंद होतील, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडियाला गद्दार असं संबोधत मीडिया हा रिपोर्ट दाखवणार नसल्याचंही सांगितलं आहे.