शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शांततेसाठी ७० वर्षांत भारतीयांचे सर्वाधिक बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:03 IST

गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे.

संयुक्त राष्ट्रे : गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे. त्यांची संख्या १६३ असून त्यात लष्करी जवान, पोलिस व नागरिकांचा समावेश आहे.संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, १९४८ सालापासून ते आजवर जगभरातील शांती मोहिमांत ३७३७ शांतीरक्षकांनी बलिदान दिले. त्यात भारतातील शांतीरक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या शांती मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने आपले पोलीस व लष्करी जवान पाठविणाऱ्या अग्रणी देशांत भारत तिसºया क्रमांकावर आहे. अ‍ॅबेई, सायप्रस, काँगो, हैती, लेबनॉन, मध्य पूर्वेतील देश, दक्षिण सुदान, पश्चिम सहारा भाग येथे सध्या सुरु असलेल्या शांती मोहिमांत भारताचे ६६९३ शांतीरक्षक सहभागी झाले आहेत. या शांतीरक्षकांना शस्त्रसज्ज करण्यासाठी तसेच अन्य तयारीपोटी गेल्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत लक्षात घेतल्यास संयुक्त राष्ट्रांकडून भारताला ९ कोटी २० लाख डॉलर इतकी रक्कम येणे आहे.संयुक्त राष्ट्रांनी शांती मोहिमा सुरु केल्याच्या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली तसेच शांतीरक्षक दिनानिमित्त मंगळवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शांतीरक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सध्या जगभरात सुरु असलेल्या चौदा शांती मोहिमांमध्ये विविध देशांतील पोलिस व लष्करातील ९६००० हजार जवान सहभागी झाले असून १५ हजार नागरिक या मोहिमांतील कर्मचारी व १६०० जण कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत.संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, जगभरातील शांती मोहिमांमध्ये गेल्या सत्तर वर्षांत १० लाख पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. त्यांनी अनेक निरपराधी लोकांचे जीव वाचविले आहेत. २०१७ साली शांती मोहिमांत विविध देशांतील १३७ शांतीरक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.