शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:15 IST

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले होते.

दोन दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक केली. बलुचीस्तानच्या बंडखोरांनी ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात आरोप केले होते. आता या आरोपाला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. 

सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे  प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशाचे खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.

पाकिस्तानने आरोप काय केले होते?

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी गुरुवारी आरोप केले होते. ते म्हणाले होते की,  जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या संपर्कात होते. शफकत अली खान यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात भारताचा सहभाग आहे. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यातही दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या हँडलर्स आणि मास्टरमाइंडच्या संपर्कात होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध बऱ्याच काळापासून तणावपूर्ण आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला. काबूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी फर एक्सप्रेसचे अपहरण करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने या ऑपरेशनचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ जारी केलेले नाहीत.

बलुच बंडखोर संघटना बीएलएने पाकिस्तानी सैन्याचे दावे फेटाळून लावले. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच म्हणाले, 'अनेक आघाड्यांवर अजूनही युद्ध सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य ना युद्धभूमीवर जिंकू शकले, ना ते आपल्या ओलिस सैनिकांना वाचवू शकले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान