काल पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे बलुच बंडखोरांनी अपहरण केले. दरम्यान, आता या दहशतवादी हल्ल्याबाबत, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी रेल्वे अपहरणावरून भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडले होते, तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुच बंडखोरांनी २१४ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावाही केला आहे.
बराक ओबामा - पत्नी मिशेल यांचा घटस्फोट? पॉडकास्टच्या माध्यमातून देणार 'फायनल' उत्तर
दरम्यान, आता पाकिस्तानने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने भारतावर खापर फोडायचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी बलुचिस्तान ट्रेन अपहरण घटनेबाबत भारतावर निराधार आरोप केले आहेत. राणा सनाउल्लाह यांनी दावा केला की 'या हल्ल्यामागे भारताचा हात आहे.' ते म्हणाले, "भारत हे हल्ले अफगाणिस्तानच्या आतून करत आहे. यावेळ पत्रकारांनी त्यांना विचारले की,'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच बंडखोरांमध्ये काही संबंध आहे का?' टीटीपी बलुचांना पाठिंबा देते का? तर याला उत्तर देताना राणा सनाउल्ला म्हणाले, 'भारत हे सर्व करत आहे, यात काही शंका नाही.
राणा सनाउल्लाह म्हणाले, 'अफगाणिस्तानात बसून ते सर्व प्रकारचे कट रचतात. पाकिस्तानचे शत्रू सक्रिय आहेत आणि आता त्याबद्दल दुसरे मत नाही. हा राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्याही अजेंड्याचा भाग नाही, तर एक कट आहे. भारतावर गंभीर आरोप करत ते म्हणाले, 'हो, भारत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच लिबरेशन आर्मी दोघांनाही पाठिंबा देत आहे, असंही ते म्हणाले.