शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मित्र ‘लुना’ घेऊन निघाला चंद्रावर, उतरून पाणी शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:26 IST

‘चंद्रयान ३’च्या दोन दिवस आधी रशियन यानाच्या लँडिंगची शक्यता

मॉस्को : भारताचा मित्र रशियाने ४७ वर्षांनंतर आपली चंद्रमोहीम सुरू केली असून, चंद्रयान ‘लुना-२५’ शुक्रवारी प्रक्षेपित केले आहे. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्रावरील पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. १९७६ नंतर रशियाने प्रथमच चंद्रयान पाठवले आहे.

अमूर ओब्लास्टमधील वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून हे प्रक्षेपण करण्यात आले. हे ठिकाण मॉस्कोपासून पूर्वेस सुमारे ५,५५० किमी अंतरावर आहे.रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, लुना-२५ चंद्रावर रवाना झाले आहे. सुमारे ५ दिवस चंद्राच्या दिशेने त्याचा सलग प्रवास राहील. यानंतर ते ७-१० दिवस चंद्राच्या कक्षेत फिरेल आणि २१ किंवा २२ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते. भारताने १४ जुलै रोजी चांद्रयान-३ लाँच केले जे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे.

प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग होणाररशियाने यापूर्वी १९७६ मध्ये मिशन लुना-२४ चंद्रावर उतरवले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्रमोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

८०० किलो लँडरचे वजन असून, ते मातीचे नमुने घेऊन विश्लेषण करणार४६.३ मीटर  लांब हे रॉकेट असून, ते सोयूझ २.१ बी रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. ३१३ टन  वजनाचे हे रॉकेट असून, त्याचा व्यास १०.३ मीटर आहे.४टप्पे  रॉकेटने लुना-२५ लँडर पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडले.

‘लुना-२४’ने काय केले?१९७६ मध्ये प्रक्षेपित केलेले लुना-२४ सुमारे १७० ग्रॅम चंद्राच्या धुळीसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले होते.

इस्रो म्हणाले... तुम्हाला शुभेच्छाइस्रोने रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉस्मॉस’चे ‘लूना-२५’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्याबद्दल अभिनंदन केले. आमच्या प्रवासात आणखी एक भेट आश्चर्यकारक आहे. तुम्हाला शुभेच्छा.

टॅग्स :russiaरशिया