शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष कार्टर यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय भारतातील 'या' गावाचं नाव, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:12 IST

Indian Village named after Jimmy Carter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी १९७८ साली भारताला भेट दिली होती

Indian Village named after Jimmy Carter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. जिमी कार्टर यांचे भारताशी घट्ट नाते आहे. त्यांच्या कार्याची छाप भारतावरही पडली. कार्टर यांना 'भारताचे मित्र' म्हटले जायचे. १९७७ मध्ये, आणीबाणी उठवल्यानंतर आणि जनता पक्षाच्या विजयानंतर ते भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. १९७८ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली. याच काळात त्यांच्या दौऱ्यामुळे भारतातील एका गावाचे नाव 'कार्टरपुरी' ठेवण्यात आले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर ३ जानेवारी १९७८ मध्ये गुरुग्राम जिल्ह्यातील दौलतपूर नसिराबाद गावात आले. या गावात त्यांनी नीट पाहणी केली. तेथील गावकरी त्यांच्यावर इतके खुश झाले की त्यांनी कार्टर यांना हरियाणवी पोशाखही भेट दिला. त्यावेळी त्या सरकारने या गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवले आणि त्यामुळे दौलतपूर नशिराबाद ही 'कार्टरपुरी' झाले.

कार्टर फक्त हरयाणाच्या गावातच का गेले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौलतपूर नसिराबाद गावातच का गेले? असे प्रश्न बरेचवेळा येतो. त्याचे उत्तर असे की त्यांची आई बेसी लिलियन अनेकदा या गावात येत असे. त्यामुळेच ते या गावाला भेट देण्यासाठी आले होते. याशिवाय जिमी कार्टर यांना भारतातील एखादे गाव आणि संस्कृतीदेखील पाहायची होती. हे गाव दिल्लीच्या अगदी जवळ होते, त्यामुळेच त्यांनी ते गाव निवडले होते. कार्टर यांची गावातील भेट इतकी यशस्वी झाली की काही काळानंतर गावातील रहिवाशांनी गावाला 'कार्टरपुरी' असे नाव दिले. जेव्हा कार्टर यांना २००२ मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळाले, तेव्हा गावाने उत्सव साजरा केला होता. तसेच कार्टरपुरीमध्ये ३ जानेवारीला गावाला सुट्टी असते.

टॅग्स :USअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्षHaryanaहरयाणा