शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 08:36 IST

हजारो विद्यार्थ्यांना संकटातही मायदेशी परतण्याची आस

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर माेठे संकट आले आहे. नागरिकांची खाण्यापिण्याची वानवा झाली असून, पॅकबंद अन्नाच्या किमती २ ते ३ पटींनी वाढल्या आहेत. अनेकांना बिस्कीट, चिप्स आणि पाण्यावर गेले दाेन दिवस काढावे लागले आहेत, तर हंगेरीच्या सीमेवर पाेहाेचलेल्या विद्यार्थ्यांना अनेक तास ओलांडूनही सीमा पार करता आलेली नाही. उणे दोन अंश सेल्सिअस तापमानात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा धीर खचू लगाला आहे. मात्र, या परिस्थितीला धैर्याने ताेंड देत विद्यार्थी मायदेशी परतण्याची आस लावून बसले आहेत. इवानाे येथून १८ विद्यार्थी हंगेरीच्या सीमेवर भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता पाेहाेचले. सुमारे ७०० किलाेमीटरचा प्रवास त्यांनी जीव मुठीत घेऊन केला. मात्र, त्या ठिकाणी वाहनांची लांब रांग लागली आहे. रिझवान नावाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवर व्हिडिओ पाेस्ट करून व्यथा मांडली आहे. ताे म्हणाला, आमचे धैर्य खचू लागले आहे. सीमेवर एकही भारतीय अधिकारी नाही, काेणीही जबाबदारी घेत नाही. 

एखाद्या क्षेपणास्त्राने आम्हाला उडविले असते तर बरे झाले असते, असे ताे उद्वेगाने बाेलला. दूतावासाने दिलेल्या चेक पाॅइंटवरील हेल्पलाईन क्रमांकावर काेणाशीही संपर्क हाेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

टर्नाेपील हे शहर रेड झाेनमध्ये आहे. रशियन विमाने या ठिकाणी बाॅम्ब हल्ले करीत आहे. शुभम नावाच्या विद्यार्थ्याने हा कटू अनुभव साेशल मीडियातून मांडला. त्याने सांगितले, की आम्हाला हाॅस्टेलच्या तळघरात ठेवले आहे. या ठिकाणी लाेक लपलेले आहेत, हे कळू नये म्हणून रात्री लाईट बंद करावी लागते.  खाण्यापिण्याच्या वस्तू दोन-तीन पटींनी महाग झाल्या आहेत. आम्ही चिप्स, बिस्कीट आणि पाण्यावर दाेन दिवस काढले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया