शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारतानं चीनला दाखवली ताकद! पेंगाँगमध्ये उतरवली खास बोट; सैन्याला मिळालं ड्रोन अन् AK-203!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:50 IST

भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे.

भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LOC) जवळ असलेल्या पेंगाँग लेकमध्ये मंगळवारी चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पेंगाँग लेकमध्ये एक खास बोट उतरवण्यात आली आहे. या बोटींच्या माध्यमातून गरज पडल्यास भारतीय लष्कर चीनच्या कोणत्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देऊ शकणार आहे. यासोबतच मंगळवारी भारतीय लष्कराला अँटी पर्सनल माइन्स, ड्रोन, एके-203 रायफल्स आणि एफ इनसास रायफल्सही मिळाल्या आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी भारतीय लष्कराला पेंगाँग लेकवर विशेष उतरवण्यात आली. भारतीय लष्कर या बोटीचा वापर करुन लँडिंग क्राफ्ट अटॅक ड्रिलही केले गेले. या विशेष बोटीमध्ये एकाच वेळी ३५ जवान चढू शकतात. ही बोट अतिशय आधुनिक आहे. यामध्ये ३५ सैनिक एकावेळी प्रवास करत पेंगाँग लेकच्या कोणत्याही भागात पोहोचू शकतात. यासाठी अत्यंत कमीत कमी वेळात ते शत्रुच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतात. 

भारतीय लष्कराच्या ताफ्यात ड्रोन अन् युद्ध वाहनही भारतीय लष्कराला एलओसीजवळ सुरक्षा मजबूत करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले ड्रोनही मिळाले आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून एलओएसीच्या आजूबाजूच्या भागावर सहज नजर ठेवली जाऊ शकते. यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही गस्त घालण्यासाठी विशेष प्रकारची लढाऊ वाहनं देखील लष्कराकडे सुपूर्द केली आहेत. यामुळे चिनी सैन्याला कोणत्याही परिस्थितीत चोख प्रत्युत्तर देता येईल.

याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अँटी पर्सनल माईन निपुणही लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अशा सुमारे ७ लाख भूसुरुंग लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासोबतच अमेठीत रशिया आणि भारत संयुक्तपणे एके-203 रायफल्स बनवणार आहेत. मंगळवारी याचे सादरीकरण करण्यात आले. राजनाथ सिंह म्हणाले की, ही यंत्रणा आणि उपकरणे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्याच्या ऑपरेशनल तयारीला अधिक बळकट करतील.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान