शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भारत अमेरिकेकडून घेणार खनिज तेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 04:53 IST

भारताने अमेरिकेकडून प्रथमच १०० दशलक्ष डॉलर किंमतीचे खनिज तेल खरेदी केले

वॉशिंग्टन : भारताने अमेरिकेकडून प्रथमच १०० दशलक्ष डॉलर किंमतीचे खनिज तेल खरेदी केले असून अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून खनिज तेल घेऊन निघालेले पहिले जहाज सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ओडिशाच्या पारादीप बंदरात पोहोचणे अपेक्षित आहे.अमेरिकेने आपल्या देशातील खनिज तेलाच्या निर्यातीवर ४० वर्षे बंदी घातली होती. दोन वर्षांपूर्वी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ही बंदी उठविली. गेल्या २६ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिला भेटीत ऊर्जा क्षेत्रात उबय देशांचे संबंध अधिक बळकट करण्याचे ठरले. त्यानंतर ट्रम्प यांनी भारताच्या ऊर्जेच्या गरजा भागविण्यास अमेरिका दीर्घकालीन व विश्वासार्ह भागीदार बनेल, अशी ग्वाही दिली.पेट्रोलियम उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेने खनिज तेलाचे उत्पादन कमी केल्याने विशेषत: आखाती देशांतील तेलांच्या किमती वाढल्या. त्यामुळे वाहतुकीचा खर्च धरूनही अमेरिकेचे खनिज तेल किफायतशीर झाले. या संधीचा फायदा घेत इंडियन आॅईल आणि भारत पेट्रोलियम या भारताच्या दोन सरकारी कंपन्यांनी अमेरिकेकडून चार दशलक्ष बॅरल खनिज तेल खरेदीचे व्यवहार केले.भारतीय कंपन्यांनी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून हे खनिज तेल खरेदी केले आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी बुधवारी टेक्सासचे गव्हर्नर ग्रेरग अ‍ॅबॉट यांना या तेलखरेदीचे औपचारिक दस्तावेज सुपूर्द केले.त्यानंतर भारतीय वकिलातीने टिष्ट्वट करून या घटनेचे पथदर्शक घटना म्हणून वर्णन करत सरना व अ‍ॅबॉट यांच्या भेटीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली. (वृत्तसंस्था)>चौथा प्रमुख देशओबामा यांनी निर्यातबंदी उठविल्यानंतर अमेरिकेचे खनिज तेल खरेदी करणारा भारत हा जपान, चीन व दक्षिण कोरियानंतर आशिया खंडातील चौथा प्रमुख देश ठरला. जागतिक पातळीवर भारताचा तेल आयातीत तिसरा क्रमांक लागतो.