शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:47 IST

भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

India-Pakistan: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाऊले उचचली आहेत. आता भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधून कोणत्याही प्रकारच्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. सरकारने शनिवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जर कोणाला या बंदीतून सूट हवी असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगण्यात आलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातून भारतात कोणत्याही वस्तूंची आयात होणार नाही. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. २ मे रोजी वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदी अंतर्गत,  पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी असेल. ती थेट आयात असो किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही तिसऱ्या देशातून असो पाकिस्तानल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

भारत सरकारने लादलेले हे निर्बंध २०२३ च्या परराष्ट्र व्यापार धोरणात नवीन तरतुदी असल्याचे सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही परिस्थितीत आयातीला परवानगी दिली गेली तर त्यासाठी भारत सरकारची विशेष मान्यता आवश्यक असेल. दुसरीकडे, भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पाकिस्तानला दिलेल्या कर्जांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. याशिवाय, पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट होणे आणि आयएमएफने कर्ज मंजूर न करणे हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असेल.

भारताने पाकिस्तानी जहाजांना बंदरांवरून बंदी

दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानातील बंदरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलीय. भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी, व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत तात्काळ निर्बंध लादण्यात आले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत