शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:41 IST

India-Russia Relation: भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाने वेळोवेळी भारताला मदत केली आहे. ही मैत्री अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहे.

India-Russia Relation: भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाने प्रत्येकवेळी भारताला मदत केली आहे. या मैत्रीत नेहमी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतो. आता जागतिक भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात अमेरिकेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचे भारताबद्दल एक धक्कादायक विधान समोर आले आहे. यामध्ये ते रशियाकडून शस्त्रे खरेदी करण्यास आणि भारत ब्रिक्सचा सदस्य असल्याबद्दल आक्षेप घेत आहेत.

भारताने नेहमीच अमेरिका आणि रशिया दोघांशीही चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, कोणत्याही दबावाशिवाय भारताने आपले हितसंबंध साधले आहेत. पण, यामुळेच अमेरिकेला त्रास होऊ लागला आहे. अमेरिकेच्या नाराजीचे खरे कारण रशियाकडून शस्त्रे खरेदी करणे असल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन सतत भारतविरोधी विधाने करत आहे.

अमेरिकन मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी 

वॉशिंग्टन डीसी येथे एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले, "भारत सरकारने काही गोष्टी केल्या आहेत, ज्यांचा सामान्यतः अमेरिकेवर वाईट परिणाम होतो." उदाहरण देताना ते म्हणाले, "तुम्ही सामान्यतः तुमची लष्करी उपकरणे रशियाकडून खरेदी करता. जर तुम्ही रशियाकडून तुमची शस्त्रे खरेदी करणार असाल, तर हा अमेरिकेला त्रास देण्याचा एक मार्ग आहे." 

ते पुढे म्हणाले की, "अमेरिकेतील लोकांवर मित्र बनवण्याचा आणि प्रभाव पाडण्याचा हा मार्ग नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर थेट भाष्य केले आहेत. त्यांनी भारत सरकारला या समस्येकडे लक्ष देण्याचा आणि परिस्थिती सुधारण्याचा सल्लाही दिला आहे."

रशिया भारत मैत्रीमुळे अमेरिका अस्वस्थ अमेरिका रशियाला आपला शत्रू मानते. तसेच, अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. भारताकडून शस्त्रे खरेदी करणे आणि ब्रिक्सचा सदस्य असणे, रशियाची ताकद वाढवत आहे. म्हणूनच, अमेरिकेने आजकाल भारतविरोधी विधाने सुरू केली आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतrussiaरशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी