शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारत आगीबरोबर खेळतोय, हात पोळल्याशिवाय राहणार नाही - चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:58 IST

चीनच्या सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला दररोज धमक्या आणि इशारे देण्याची मालिका सुरुच आहे.

ठळक मुद्देपीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या लेखातून भारताला उपदेशाचा डोस पाजण्यात आला आहे. भारताने तात्काळ आपले सैन्य तिथून मागे घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे.

बिजींग, दि. 10 - चीनच्या सरकारी मालकीच्या वर्तमानपत्रांमधून भारताला दररोज धमक्या आणि इशारे देण्याची मालिका सुरुच आहे. आता पीपल्स डेली या वर्तमानपत्राच्या लेखातून भारताला उपदेशाचा डोस पाजण्यात आला आहे. डोकलाममध्ये जो संघर्ष सुरु आहे त्यातून भारताची भूराजनैतिक महत्वकांक्षा दिसून येते. भूतानच्या संरक्षणाच्या नावाखाली भारताचे स्वत:चे महासत्ता बनण्याचे स्वप्न दडले आहे अशी टीका लेखातून करण्यात आली आहे. 

डोकलामचा तिढा सोडवण्यासाठी भारताने तात्काळ आपले सैन्य तिथून मागे घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे डोकलाम हा चीनचा भूभाग असून तिथे भारतीय सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. जूनच्या मध्यपासून दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. डोकलाम भूतानच्या हद्दीत येते पण डोकलाम आपल्या हद्दीत येते असा चीनचा दावा आहे. भारताला आशियामध्ये वर्चस्व गाजवायचे आहे. भारत चीनकडे आपल्या सुरक्षेसाठी एक गंभीर धोका म्हणून पाहतो असे लेखात म्हटले आहे. भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनने जे पाऊल उचलले आहे त्याने फक्त चीनच्या हद्दीचेच उल्लंघन होत नाहीय तर, भूतानच्या अखंडतेला आणि स्वांतत्र्यालाही धोका निर्माण झाला आहे असे लेखात लिहीले आहे. 

चीनचा संयम संपत चालला आहे. भारत आगीबरोबर खेळतोय हे लक्षात घ्यावे, हात जळल्याशिवाय रहाणार नाहीत असे लेखात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी ग्लोबल टाइम्समधून कुठल्याही परिस्थितीत चीन युद्धाचे पाऊल उचणार नाही असा भारताचा विश्वास असेल तर, भारताचे विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लष्करी विज्ञानाला धरुन नाही. नरेंद्र मोदी सरकारने चीनच्या इशा-याकडे दुर्लक्ष करु नये अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि युद्ध अटळ असेल अशी धमकी पुन्हा एकदा ग्लोबल टाइम्सच्या लेखातून देण्यात आली आहे. 

ग्लोबल टाइम्स हे चिनी सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र असून त्यात जे छापून येते त्याकडे चीन सरकारची अधिकृत भूमिका म्हणून पाहिले जाते. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाल्यापासून ग्लोबल टाइम्सच्या लेखातून अनेकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली आहे.