शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 10:16 IST

पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमकी देत जगातील इतर देशांकडे सुरक्षेची भीक मागत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १० दिवसानंतरही भारताची भीती पाकिस्तानच्या मनातून जात नाही. भारताच्या इशाऱ्यानंतर आणि कारवाईमुळे पाकिस्ताना वॉर मोडमध्ये आला आहे. भारतीय सैन्याच्या संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानने POK मध्ये बंकर खोदकाम सुरू केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून तिथे सैन्य चौकी बनवली जात आहे. युवकांना हत्यारांचे ट्रेंनिग देणे सुरू झाले आहे. खैबर पख्तूनख्वासारख्या संवेदनशील भागात वॉर सायरनही लावण्यात आलेत.

सूत्रांनुसार, पाकिस्तानी सैन्याने POK मध्ये गुप्त बंकर तयार केलेत. सर्वसामान्य लोकांच्या घरांवर कब्जा करून तिथे सैन्य छावणी उभारली जात आहे. गिलगित-बालिस्टानच्या युवकांना शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिले जात आहे. भारताने पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यापासून पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमकी देत जगातील इतर देशांकडे सुरक्षेची भीक मागत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान अलीकडेच तुर्कीच्या राजदूतांना भेटले. भारत युद्ध थोपवत असल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला आहे.

शनिवारी पाकिस्तानने ४५० किमी रेंजची अब्दाली बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केल्याची माहिती आहे. परंतु वास्तवमध्ये भारताच्या अग्नी मिसाईलसमोर पाकिस्तानची ही मिसाईल काहीच नाही, ना पाकची मिसाईल भारताला नुकसान पोहचवण्यात सक्षम आहे. अब्दालीच्या ४५० किमी रेंज असणाऱ्या मिसाईलच्या तुलनेने भारताची अग्नी मिसाईल ४ हजार किमी हून अधिक रेंजची आहे. सध्या पाकिस्तानी एअरफोर्सकडून ३ मोठे युद्ध सराव सुरू आहेत. ज्यात F16, J10, JF17 सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानने राजस्थाननजीक लॉन्गेवाला सेक्टरमध्ये आधुनिक रडार तैनात केली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात वॉर सायरन वाजवले जात आहेत. 

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती, वाघा अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी जहाज, सामानांवर बंदी, भारताकडून पाकला जाणारी पोस्ट सेवा बंद, पाकिस्तान राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले. भारत कुठल्याही दहशतवाद्याला आणि त्याला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही. दहशतवादी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट इशारा दिला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला