शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 08:45 IST

पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रं

नवी दिल्ली : भारत, चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) ताज्या अहवालातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. आशियातील तीन प्रमुख देश असलेल्या भारत, चीन आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे. सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचं सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे. आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असं निरीक्षण सिपरीनं नोंदवलं आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात तिन्ही देशांकडे असणाऱ्या अण्वस्त्रांबद्दलची आकडेवारी देण्यात आली आहे. 'गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या 270 इतकी आहे. आता ती वाढून 280 वर पोहोचली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला 130 ते 140 अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या 140 ते 150 इतकी आहे. मात्र यातील कोणतंही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेलं नाही,' असं सिपरीचा अहवाल सांगतो. चीननं गेल्या वर्षी संरक्षण दलांवर 228 अब्ज डॉलर खर्च केला आहे. संरक्षण सामर्थ्यावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केल्याचं सिपरीचा अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 'भारत आणि पाकिस्ताननं जमीन, हवा आणि समुद्रातून डागता येणारी अण्वस्त्र तयार करण्यास प्राधान्य दिलं आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात प्रत्येकी 10 अण्वस्त्रांनी वाढ केली आहे', अशी आकडेवारी अहवालात आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन