शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"भारत तटस्थ नाही, आम्ही...!" ट्रम्प यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर PM मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 06:20 IST

Narendra Modi-Donald Trump Meeting : पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली...

PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज व्हाइट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास भेट झाली. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली. तसेच, "अनेकांना वाटते की, भारत 'तटस्थ' आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, भारत तटस्थ नाही. आमचाही आपला एक पक्ष आहे आणि आमचा पक्ष आहे 'शांतता'. कारण, हा युद्धाचा काळ नाही. युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.   रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपल्याला माहीतच आहे की, मी रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांच्या संपर्कात होतो. मी स्वतः दोन्ही देशांना भेटीही दिल्या आहेत. अनेकांना असे वाटते की भारत 'तटस्थ' आहे. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की, भारत तटस्थ नाही. आमचाही आपला एक पक्ष आहे आणि आमचा पक्ष आहे 'शांतता'."

युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत -मोदी पुढे म्हणाले, "मी आमच्या याच एका सिद्धांतावर बोलताना, राष्ट्रपती पुतीन यांच्या उपस्थितीत माध्यमांसमोर स्पष्टपणे म्हणालो होतो की, हा युद्धाचा काळ नाही. आजही माझा दृढ विश्वास आहे की, युद्धाच्या मैदानावर समस्या सूटत नाहीत. त्या चर्चेच्या टेबलावरच सुटतात. भारताचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, दोन्ही पक्षाचे लोक उपस्थित असतील, अशा फोरममध्ये चर्चा झाल्यानंतरच काही मार्ग निघेल. राष्ट्रपती ट्रम्प जो प्रयत्न करत आहेत, मी त्याचे स्वागत करतो, समर्थन करतो आणि माझी इच्छा आहे की, राष्ट्रपती ट्रम्प या प्रयत्नांत लवकरात लवकर यशस्वी व्हावेत आणि जगात शांततेचे मार्ग खुले व्हावेत." 

PM मोदीही म्हणाले, 'एक और एक 11' -भारत-अमेरिकेच्या भागिदारी संदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "भारत आणि अमेरिकेच्या भागिदारीने मानवतेला मोठा लाभ होईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात. याच पद्धतीने 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवणे 1.4 अब्ज भारतीयांची आकांक्षा आणि संकल्प आहे. आपल्या भेटीचा अर्थ 'एक और एक 11' आहे. जो मानवतेसाठी एकत्रितपणे काम करेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प