शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

India China Face Off: भारत-चीनमधील संघर्षावर आमचे जवळून लक्ष- अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 02:52 IST

चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती.

वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतरच्या परिस्थितीवर अमेरिका खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि उभय देश मतभेद शांततेने मिटवतील, अशी आशा आहे, असे परराष्ट्र विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती. भारत आणि चीन यांच्यात आधीच सीमावाद चिघळलेला असताना त्यात या संघर्षाने भर घातली. ‘‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत,’’ असे परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्याने सोमवारी म्हटले. या संघर्षात आमचे २० सैनिक मरण पावल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले असून, आम्ही त्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे हा प्रवक्ता म्हणाला. भारत आणि चीनने हा तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, सध्याची परिस्थिती शांततेने दूर करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे त्याने म्हटले.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून रोजी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर टेलिफोनवर चर्चा झाली होती, असे त्याने सांगितले.दक्षिण आशिया हा महत्त्वाचा - अ‍ॅलिसा आयरेजआघाडीच्या अमेरिकनतज्ज्ञांनी म्हटले की, चिनी लष्कराच्या योजनाबद्ध डावपेचांनी संपूर्ण विभागाला धोका निर्माण केलेला आहे. यातून अमेरिकेने एकच धडा घ्यायचा आहे तो म्हणजे भारत-चीन सीमा ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या रडार स्क्रीनवर हवी. कारण चीनची अरेरावी वाढत चालली आहे, असे कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्सच्या अ‍ॅलिसा आयरेज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, दक्षिण आशिया हा महत्त्वाचा असून, इंडो-पॅसिफिकचा तो मध्यभाग आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका