शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चिरंतन विकासात भारत पिछाडीवर!

By admin | Updated: July 23, 2016 05:07 IST

चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११0 वे आहे.

संयुक्त राष्ट्रे : चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११0 वे आहे. स्वीडन जगात सर्वोच्च स्थानी आहे. चिरंतन विकास समाधान नेटवर्क (एसडीएसएन) आणि बर्टल्समॅन स्टिफगंग यांनी संयुक्तरीत्या ‘चिरंतन विकास निर्देशांक’ सादर केला आहे. या क्षेत्रात प्रत्येक देशाने केलेली प्रगती आणि उत्तरदायित्व निश्चित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे.१४९ देशांची आकडेवारी तपासून हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. २0१६ मधील कामगिरीचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. जागतिक पातळीवर १७ उद्दिष्टांना श्रेणी देऊन विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. या उद्दिष्टांत आर्थिक विकास, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणपूरकता आदींचा समावेश आहे. एसडीएसएनचे संचालक जेफ्री सॉक्स यांनी सांगितले की, या निर्देशांकामुळे कोणत्या देशांनी कोणती पाउले उचलली याची माहिती मिळते, तसेच या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने काय आहेत. उद्दिष्टप्राप्तीसाठी व्यवहारिक मार्ग कोणते, याचीही माहिती मिळते. उद्दिष्टप्राप्तीच्या जवळ असलेल्या देशांत मोठ्या अर्थव्यवस्थांचा नव्हे, तर तुलनेने छोटे आणि विकसित देशांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)>स्वीडन पहिल्या स्थानी, डेन्मार्क दुसरास्वीडन पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या स्थानी डेन्मार्क आणि तिसऱ्या स्थानी नॉर्वे हे देश आहेत. जर्मनी सहाव्या स्थानी, ब्रिटन १0 व्या स्थानी आहे. अमेरिका २५ व्या स्थानावर, रशिया ४७ व्या, तर चीन ७६ व्या स्थानावर आहे. भारत ११0 व्या स्थानी, लेसोथो ११३ व्या स्थानी, पाकिस्तान ११५ व्या स्थानी, म्यानमार ११७ व्या स्थानी, बांगलादेश ११८ व्या स्थानी, तर अफगाणिस्तान १३९ व्या स्थानी आहे. गरीब आणि विकसनशील देश या निर्देशांकात सर्वांत खालच्या पातळीवर आहेत. सर्वांत शेवटच्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि लायबेरिया हे देश आहेत.