शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:52 IST

UNGA : १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारतानं पॅलेस्टाईनशी संबंधित ठरावावर मतदान करण्यापासून अलिप्त राहणं पसंत केलं आहे. इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या क्षेत्रावर जो बेकायदा ताबा मिळवला आहे. तो लवकरात लवकर हटवावा आणि तोही १२ महिन्यांत कोणताही विलंब न लावता, अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. भारतानं या ठरावावर मतदान केलं नाही. १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.

या ठरावाच्या विरोधात १४ देशांनी मतदान केलं. यात इस्रायल, अमेरिका हे देश आहेत. तर भारतासह ४३ देशांनी मतदानात सहभागच घेतला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, नेपाळ, युक्रेन आणि ब्रिटन हे देश मतदानापासून लांब राहिले. इस्रायलनं बेकायदेशीर पॅलेस्टाईनचा जो भूभाग आपल्या ताब्यात घेतला आहे, तो १२ महिन्याच्या आत परत करावा, असा ठराव बुधवारी मंजूर करण्यात आला होता. ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईन प्रदेशाबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही उल्लंघनासाठी इस्रायलला जबाबदार धरले पाहिजे, असेही ठरावात म्हटले होते.

दरम्यान, पॅलेस्टाईनकडून तयार केलेला या ठरावात इस्त्रायली सरकारद्वारे संयुक्त राष्ट्र चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित ठरावांनुसार आपल्या दायित्वांकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं आहे आणि यासाठी त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. यासोबतच, अशा उल्लंघनांमुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो, यावरही भर देण्यात आला.

ठरावाच्याविरोधात मतदान करणारे देश- अमेरिका- इस्रायल- अर्जेंटिना- चेक रिपब्लिक- फिजी- हंगेरी- मलावी- माइक्रोनीशिया- नौरू- पलाउ-पापुआ न्यू गिनी- प्राग- टॉन्गा-टुवालू

टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयIsraelइस्रायल