शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये बिगरमुस्लिमांच्या संख्येत वाढ, निवडणूक आयोगाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:24 IST

पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यासाठी नवीन मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानात बिगरमुस्लीम मतदारांत पाच वर्षांत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यासाठी नवीन मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानात बिगरमुस्लीम मतदारांत पाच वर्षांत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची संख्या ३६.३ लाख झाली आहे. त्यात हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७.७ लाख आहे.पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांक मतदारांची संख्या २०१३च्या निवडणुकांच्या वेळी २७.७ लाख व त्यातील हिंदू मतदारांची संख्या १४ लाख होती. बहुतांशी हिंदू सिंध प्रांतात राहतात. ख्रिश्चन मतदारांची संख्या १६.५४ लाख आहे. त्यातील १0 लाख ख्रिश्चन पंजाब, तर दोन लाख सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी आहे. त्यातील सुमारे १0 कोटी ६0 लाख लोक मतदार असून ५.९२ कोटी पुरुष व ४.६७ कोटी स्त्री मतदार आहेत. पाकिस्तानात शीख मतदार ८८४२ तर पारसी मतदार ४२३५ आहे. भारतात पारसी समाजाची लोकसंख्या सातत्याने घटत असताना पाकिस्तानात मात्र पाच वर्षांत ती सुमारे ९00 ते वाढली आहे. (वृत्तसंस्था)सध्या सत्तेवर असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ गट (पीएमएल-एन) या पक्षाच्या सरकारचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत होत असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल लागून सत्तांतर होईपर्यंत काळजीवाहू सरकार देशाचा कारभार पाहील.भारताची भूमिका पाकला अमान्यगिलगिट-बाल्टिस्तान भागातील स्थानिक प्रशासनाचे अधिकार कमी करण्याच्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकन अब्बासी यांच्या निर्णयाबद्दल भारताने निषेध व्यक्त करून त्या देशाला खडसावले होते. भारताची ही भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे पाकने म्हटले आहे.