शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महायुद्धाच्या छायेत! चीनने सहा युद्धनौका अरबी समुद्रात उतरविल्या, रशियाची विमाने घिरट्या घालू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 08:36 IST

इस्रायल सैन्य गाझामध्ये दाखल होताच हमासशी पहिल्यांदाच जमिनीवरील टक्कर झाली आहे. हमासने इस्रायलच्या सैन्यावर अँटी टँक मिसाईल डागल्या आहेत.

गेल्या १७ दिवसांपासून धगधगत असलेली गाझा पट्टी जगाला महायुद्धाकडे घेऊन जात आहे. इस्रायल ज्या पद्धतीने गाझावर बॉम्ब टाकत आहे, ते पाहता हे युद्ध महायुद्धात बदलण्यास वेळ लागणार नाही असे संकेत आहेत. मध्य पूर्वेकडील ५७ देशांनी इस्रायली सैन्य गाझा पट्टीमध्ये घुसले तर युद्धाचे नवीन मोर्चे सुरु होतील, अशी धमकी दिली आहे. तरी देखील इस्रायल सैन्य गाझाच्या हद्दीत दाखल झाले आहे. 

इस्रायल सैन्य गाझामध्ये दाखल होताच हमासशी पहिल्यांदाच जमिनीवरील टक्कर झाली आहे. हमासने इस्रायलच्या सैन्यावर अँटी टँक मिसाईल डागल्या आहेत. इस्रायलने कुठे कुठे युद्ध सुरु होऊ शकते याचा आढावा घेतलेला आहे. यामुळे इस्रायलने थेट सिरीयावर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सिरीयाला दमिश्क आणि अलेप्पो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावे लागले आहेत. 

हे युद्ध आता इस्रायल विरोधात ५७ देश असे राहिलेले नाहीय तर यात रशिया आणि चीनचीही एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेनंतर चीनच्या एक-दोन नव्हे तर सहा युद्धनौका बॅकअपसाठी अरबी समुद्रात पोहोचल्या आहेत. अरबी समुद्रात चीनच्या सहा युद्धनौकांच्या उपस्थितीमुळे तणाव वाढला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काळ्या समुद्रात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. येमेनमधून एक-दोन नव्हे तर तीन क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली होती. इराणने इस्रायलविरुद्धच्या युद्धाला जागतिक युद्धात रूपांतरित करण्याची धमकी दिली आहे. इराणच्या स्पेशल-9 प्लॅननुसार नऊ टीमना नऊ शस्त्रास्त्रे देण्यात येणार आहेत.  

यामध्ये फतह-11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, स्कड क्षेपणास्त्र, कहार-1 क्षेपणास्त्र, खैबर शिकन क्षेपणास्त्र, बद्र-1 क्षेपणास्त्र, बुरकान-2 एच क्षेपणास्त्र, कियाम क्षेपणास्त्र, शॉर्ट रेंज रॉकेट, शाहेद 131/136 आत्मघाती ड्रोन यांचा समावेश आहे. गुप्तचर अहवालानुसार इस्रायलला नऊ आघाड्यांवर घेरले जाईल. लेबनॉन, सीरिया, वेस्ट बँक, जॉर्डन, इजिप्त, भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि इराक या नऊ आघाड्या आहेत.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धchinaचीन