वॉशिंग्टन - पाकिस्तान बनवत असलेल्या एका मिसाइलची चर्चा सध्या अमेरिकेत जोरदार सुरू आहे. अमेरिकन नॅशनल इंटेलिजेंस डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी १८ मार्च २०२६ रोजी सीनेटमध्ये मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल बनवत आहे, जी अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत पोहचू शकते असं गबार्ड यांनी म्हटलं आहे.
तुलसी गबार्ड यांनी म्हटलं की, पाकिस्तानकडे सध्या ICBM( इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल) नाही. परंतु पाकिस्तान त्यादिशेने पुढे वाटचाल करत आहे. भविष्यात ते ICBM बनवू शकतात. त्यामुळे अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा आहे असं त्यांनी सीनेटमध्ये सांगितले.
कोणती आहे ही मिसाइल?
आतापर्यंत या मिसाइलला विशेष नाव देण्यात आले नाही. मात्र अमेरिकन गुप्तचर संस्थांचा दावा आहे की, पाकिस्तान लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल तयार करत आहे. ज्याची रेंज ICBM श्रेणीत येऊ शकते. म्हणजेच ही मिसाइल ५५०० किलोमीटरहून जास्त रेंजवाली आहे. पाकिस्तान ते अमेरिकेपर्यंत अंतर जवळपास १२ हजार किमी इतके आहे. जर पाकिस्तानने ही मिसाइल बनवली तर ते अमेरिकेपर्यंत अणु हल्ला करू शकतात. पाकिस्तान मोठे रॉकेट बनवत आहे. जे भविष्यात ICBM बनवण्यासाठी मदत करतील. हा कार्यक्रम कित्येक वर्षापासून सुरू आहे असं तुलसी गबार्ड यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानात सध्या सर्वाधिक रेंज असणारी मिसाइल शाहीन ३ आहे. त्यांची रेंज २७०० किमी इतकी आहे. जी संपूर्ण भारताला कव्हर करतात इतकेच नाही तर अंदमान निकोबारपर्यंतही पोहचते. सॉलिड फ्यूलमधील ही मिसाइल लगेच लॉन्च करता येते. याची लांबी १८ मीटर एवढी आहे. २०१५ साली पहिल्यांदा याची चाचणी घेण्यात आली होती.
दरम्यान, पाकिस्तान या मिसाइलहून पुढे जात मोठे रॉकेट मोटर टेस्ट करत आहे. आतापर्यंत पाकिस्तानने ICBM चाचणी केली नाही परंतु अमेरिकेने चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी आणली आहे ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली आहे. रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान सर्व मिसाइल बनवत आहेत जे अमेरिकेला टार्गेट करू शकतात. याआधी पाकिस्तानी मिसाइल केवळ भारतापुरती मर्यादित होती परंतु जर त्यांनी ICBM बनवले तर अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू शकते. २०३५ पर्यंत हा धोका कित्येक पटीने वाढू शकतो असं गबार्ड यांनी म्हटलं. मात्र हे केवळ भारताविरोधात आहे परंतु अमेरिका त्यांच्यासाठी हा धोका मानते. अद्याप ही मिसाइल तयार झाली नाही परंतु वेगाने तिचे काम प्रगतीपथावर आहे असं पाकिस्तानने म्हटलं.
Web Summary : Pakistan's developing long-range ballistic missile, potentially ICBM-class, worries the US. It could reach American soil, a threat amplified by ongoing Middle East conflicts. US intelligence suggests rapid progress, despite existing limitations, posing a significant security challenge by 2035.
Web Summary : पाकिस्तान द्वारा विकसित लंबी दूरी की बैलिस्टिक मिसाइल, जो संभावित रूप से ICBM श्रेणी की है, अमेरिका के लिए चिंता का विषय है। यह अमेरिकी धरती तक पहुँच सकती है, जो मध्य पूर्व में चल रहे संघर्षों से और बढ़ गया है। अमेरिकी खुफिया जानकारी के अनुसार, मौजूदा सीमाओं के बावजूद तेजी से प्रगति हो रही है, जिससे 2035 तक एक महत्वपूर्ण सुरक्षा चुनौती खड़ी हो सकती है।