शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात सरकारी बैठकीत फक्त चहा, बिस्कीटच मिळणार; पंतप्रधान, मंत्री पगार घेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 07:48 IST

सरकारी खर्च कपातीसाठी उचलली पावले, ३ प्रमुख कार उत्पादकांनी महिनाभरातच तीनवेळा कारच्या किमतीत वाढ केली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडत हाेत असल्याची चिन्हे आहेत. सरकारने वीज, पाणी, गॅस,दूरध्वनी इत्यादींचे बिल मंत्र्यांनी स्वत:च्याच खिशातून भरण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर स्वत: पंतप्रधान आणि इतर मंत्री पगार घेणार नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीर केले आहे. आंतराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम सरकारी खर्चावर कपात करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेसाठीही यातून खर्च कमी करण्याबाबतचा एक संदेश आहे. ३ प्रमुख कार उत्पादकांनी महिनाभरातच तीनवेळा कारच्या किमतीत वाढ केली आहे. दुचाकींच्या किमतीतही माेठी वाढ झाली आहे. 

खर्च कमी करण्यासाठी हे करणारसरकारी लक्झरी वाहने जप्त करून लिलाव करणारमंत्र्यांच्या अनावश्यक विमान प्रवासावर बंदीगरज असल्यास इकाॅनाॅमी क्लासमध्ये करणार प्रवासपरदेशात पंचतारांकित हाॅटेल्समध्ये मुक्काम  करता येणार नाहीसरकारी बैठकीत एक डिश आणि चहा-बिस्कीटच मिळणाररात्री ८.३० वाजताच्या आत माॅल, मार्केट बंद.

सर्वांनाच बसला फटकाचीन, अमेरिका, भारत, जपान या देशांच्या तुलनेत पाकिस्तानातील कार उद्याेग खूपच लहान आहे. उच्चभ्रू लाेकांकडून महागड्या गाड्यांना जास्त मागणी राहते. त्यातुलनेत स्थानिक उत्पादकांना फार वाव राहत नाही. मात्र, वाढलेल्या किमतीचा सर्वांनाच माेठा फटका बसला आहे.

कार खरेदी करण्याचे स्वप्न पाकिस्तानात दिवास्वप्न ठरत आहे. दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर पाेहाेचलेल्या पाकिस्तानात थाेडीथाेडकी नव्हे तर १४९%नी कारच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ गेल्या पाच वर्षांमध्ये झाली आहे. पाकिस्तान बिझनेस फाेरमनुसार, २०१८ ते २०२३ या ५ वर्षांमध्ये कारच्या किमतीत १४९ टक्के एवढी वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानी चलनाची अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत माेठ्या प्रमाणावर झालेली घसरण. त्यात घसरण झाल्यास कार आणखी महाग हाेतील.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान