शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयी वसंत फुलताना...! चीननं कॉलेज विद्यार्थ्यांना दिली 'स्पेशल' ७ दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 11:51 IST

चीनच्या अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एक आठवड्यासाठी स्प्रिंग ब्रेक देण्याची घोषणा केली आहे

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीननं अनेक कायदे केले होते. त्याचा आता उलट परिणाम पाहायला मिळत आहेत. चीनमध्ये मुलांचा जन्मदर घसरत असल्याने सरकार चिंतेत आले आहे. आता चीनमधील जोडप्यांनी जास्त बाळांना जन्म द्यावा यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. देशातील जन्म दर वाढवण्यासाठी सरकार नवनवीन निर्णय घेत आहेत. त्यात आता सरकारसोबत शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. 

मियायांग फ्लाइंग वोकेशनल कॉलेजनं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली आहे. स्प्रिंग बेक हा चीनमधील युवक युवतींना वसंत ऋतु फुलताना प्रेमाचा बहर उमलावा यासाठी देत आहे. चीनच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रेम आणि रोमान्स करण्यासाठी सुट्टी दिली आहे. एनबीसी न्यूजनुसार, चीनच्या अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एक आठवड्यासाठी स्प्रिंग ब्रेक देण्याची घोषणा केली आहे. मियायांग फ्लाइंग वोकेशनल कॉलेजनं पहिल्यांदा या ब्रेकची २१ मार्चला घोषणा केली. 

स्प्रिंग ब्रेक घोषणेनुसार, लियांग गुओहुई मियायांग फ्लाइंगच्या डिप्टी डिनने सांगितले की, या सुट्टीच्या काळात युवक युवती निसर्गाशी एकरूप होऊन अनेक ठिकाणी जातील, वसंत ऋतुचा आनंद घेतील. यातून केवळ विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणार नसून पुन्हा वर्गात आल्यानंतर त्यांची शैक्षणिक आणि बौद्धिक क्षमताही वाढवेल. त्याशिवाय शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना तुमच्या प्रेमाचा शोध घ्या असंही सूचित करण्यात आले आहे. 

१ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान सुट्टीमियायांग कॉलेजप्रमाणे अन्य कॉलेजनेही १ एप्रिल ते ७ एप्रिल या काळात सुट्टीची घोषणा केली आहे. निसर्गाशी प्रेम, आयुष्यातील प्रेम करण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी स्प्रिंग ब्रेक दिला जात आहे. तसेच या स्प्रिंग ब्रेकमध्ये तुम्ही केलेल्या कार्याचे अनुभव शेअर करण्यासही सांगितले आहेत. त्यात पार्टनरसोबत ट्रिप, साइटिंग व्हिडिओ बनवणेही सामील आहेत. 

जन्मदर वाढवण्यासाठी आणलीय योजनान्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, चीन कॉलेज प्रशासनाने सरकारच्या निर्देशावर जन्मदर वाढवण्यासाठी ही अजब योजना आणली आहे. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारने २० हून अधिक शिफारशी आणल्या आहेत. त्यातून कॉलेजमध्ये स्प्रिंग ब्रेक देण्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेमाचा शोध घेण्यास वेळ मिळेल. 

टॅग्स :chinaचीन