शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:32 IST

लष्कर व आयएसआयचा वाढेल हस्तक्षेप

इस्लामाबाद : नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) जिंकल्या असून, त्यामुळे त्यांना काठावरील बहुमतही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत.आता इम्रान खान यांना पीपीपीच्या पाठिंबा मिळणार का, यावर तेथील सत्तेची गणिते अवलंबून आहेत. अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे. निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला. नॅशनल असेंब्लीबरोबरच चार राज्यांच्या असेंब्लींच्या निवडणुकाही झाल्या होत्या. पंजाब प्रांतात नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनला सर्वात जास्त १२७ तर पीटीआयला १२३ जागा मिळाल्या आहेत. मात्र २९७ सदस्य असलेल्या असेंब्लीत बहुमतासाठी १४९ जागा जिंकणे आवश्यक आहे.शरीफ यांचा बालेकिल्ला असलेला पंजाब त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिथे निवडून आलेल्या अपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पीटीआयने सुरू केल्या आहेत. एके काळी बेनझीर भुत्तो यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंध प्रांतात त्यांच्याच पीपीपीला बहुमत मिळाले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआयला बहुमत मिळाले आहे तर बलुचिस्तान असेंब्लीच्या ५१ जागांपैकी १३ जागा बलुचिस्तान अवामी पार्टीने जिंकल्या आहेत. पाकिस्तानमधील नव्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून अमेरिकेने म्हटले आहे की, दक्षिण आशियातील राजकीय स्थैर्य, शांतता वाढीस लागावी म्हणून हे सरकार प्रयत्नशील असेल अशी आशा आहे.मोदी परतल्यावर ठरणार भारताची पाकविषयीची भूमिका; सत्तांतरावर तूर्त प्रतिक्रिया नाही-संतोष ठाकूरनवी दिल्ली : पाकिस्तानातील नवे सरकारबाबत भारताची अधिकृत प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आल्यानंतरच दिली जाईल. इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, तिथे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध नवे सरकार आल्यानंतरही सुधारणार नाहीत, असाच अंदाज आहे. या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही तूर्तास परिस्थितीचे आकलन करत आहोत.आगामी काळात देशांमधील संबंध कसे राहतील यावर भारताचे माजी उच्चायुक्त जी. पार्थसारथी म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा कोणताही पाकिस्तानी नेता सोडून देऊ शकत नाही. इम्रान खान यांच्या पक्षाची स्थापनाच मुळी आयएसआय प्रमुख राहिलेले जनरल हामिद गुल यांच्या सहकार्याने झाली होती. इम्रान खान यांना तालिबान खान म्हटले जाते. तालिबानबाबत इम्रान खान यांची भूमिका सौम्यच आहे. त्यांचे सरकार सैन्याच्या मदतीने बनणार आहे. पाकमधील भारताचे माजी उच्चायुक्तराहिलेले राजीव डोगरा म्हणाले की, आताच काही बोलणे घाईचे ठरेल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तान