शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का आवश्यक असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:00 IST

US Visa: अमेरिकन व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार केल्यास व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते; संवाद साधण्यास मदत होते.

प्रश्न: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं गरजेचं का असतं?उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही नॉनइमिग्रंट किंवा इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करत असल्यास या प्रोफाईलमुळे व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते. दूतावासाकडून पासपोर्ट मिळवताना, संवाद साधला जात असताना ऑनलाइन प्रोफाईलची मदत होते. (importance of creating and updating an online profile to apply for US visa)

ऑनलाइन प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपर्काचा तपशील, पासपोर्टची माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, कागदपत्रं गोळा करण्यासंदर्भातील आणि इतर माहिती द्यावी लागते. ऑनलाइन प्रोफाईलमुळे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर (व्हीएसी), दूतावास यांच्यात आवश्यक ताळमेळ राखला जातो. यामुळे तुमच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. 

तुम्ही पहिल्यांदा अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असाल, तर न्यू युजर हा पर्याय निवडा. आधी व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास आधीच तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलवर लॉग इन करा. तुम्हाला प्रत्येकवेळी तुमची सर्व माहिती भरण्याची गरज नाही. मात्र तुम्ही कशासाठी अमेरिकेला जात आहात, याबद्दलची माहिती भरुन प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचा सध्याचा संपर्क तपशील देणंदेखील आवश्यक आहे.  

ऑनलाइन प्रोफाईल अतिशय युजर फ्रेंडली टूल आहे. यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिसा प्रक्रिया पूर्ण करू शकता. बहुतांश अर्जदारांना तिसऱ्या व्यक्तीची मदत लागत नाही. तुम्ही स्वत: संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असाल, तर चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यतादेखील कमी होते. याशिवाय पैशांचीदेखील बचत होते. मात्र तरीही थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. अशा परिस्थितीत तुमची आणि तुमच्या वतीनं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची योग्य माहिती अर्जात भरली गेली आहे ना, याची खात्री करा. चुकीची माहिती दिल्यानं तुम्ही व्हिसासाठी अपात्र ठरू शकता.

ऑनलाईन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं यामुळे तुमची अमेरिका ट्रिफ अविस्मरणीय आणि तणावमुक्त होण्यास सुरुवात होते.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा